कोल्हापूर : प्रतिनिधी : घराची वाटणी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन मुलाने आई-वडीलांचा खून केला. कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात ही दुर्दवी घटना घडली. विजयमाला भोसले (वय ७०) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७८) असे खून झालेल्या आई-वडीलांचे नाव आहे. या घटनेनंतर मुलगा सुनील नारायण भोसले (४८) स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहिला. (Parents murdered in Hupari town)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण भोसले, पत्नी विजयमाला महावीर नगरमधील अल्फाईन गल्ली येथे रहात होते. त्यांना चंद्रकांत, संजय आणि सुनील अशी तीन मुले आहेत. चंद्रकांत आणि संजय यांची दोघांची सराफी दुकाने असून ते व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास आहेत. सुनील भोसले याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्याच्या सततच्या त्रासामुळे पत्नी मुलांसह माहेरी बेळगाव येथे वास्तव्यास आहे. सुनील आई वडिलांसह रहात होता. (Parents murdered in Hupari town)
गेल्या काही महिन्यापासून घराच्या वाटणीसाठी त्याने आई वडिलांकडे तगादा लावला होता. त्यातून त्याचे त्यांच्याशी भांडण सुरू होते. पण त्याच्या मागणीकडे आई वडिलांनी दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी पहाटे झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात काठीने हल्ला करुन त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांना दगडाने ठेचले. खिडकीची काच फोडून वडिलांच्या हाताची नस कापली. यावेळी नळाला पाणी आल्याने आई घराबाहेर आल्यावर त्याने त्यांच्यावरही काचेने हल्ला केला. आईच्या हाताची नस कापली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (Parents murdered in Hupari town)
या घटनेतंर घराबाहेर बसलेला सुनील येणाऱ्या सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलत होता. त्यानंतर काही वेळाने तो स्वत: हुपरी पोलिस ठाण्यात गेला. घडलेल्या घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घरी जाऊन खात्री केली असता त्याचे आई वडील मृत्युमुखी झाल्याचे पहायला मिळाले.