पाकिस्तानला धूळ चारत भारताने क्रिकेटमध्ये जिंकले सुवर्ण

India wins gold in cricket by defeating Pakistan

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत भारताने अशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. महिला क्रिकेटमध्ये भारत संघाने यापूर्वीच सुवर्ण पदक जिंकले आहे. क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला गटात सुवर्ण पदक पटकावत डबल धमाका केला आहे. (India wins gold in cricket by defeating Pakistan)

श्रेय्यस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. अभिषेक शर्माने धडाकेबाज खेळी करत २८ चेंडूत ६१ धावांची स्फोटक खेळी केली. तिलक वर्माने २२ चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावत ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली. शिवम दुबेने २७, कर्णधार श्रेयस अय्यरने २१, इशान किशनने २० धावा केल्या. पाकिस्तानकडून अहमद दनियाल आणि अरफात मिन्हासने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (India wins gold in cricket by defeating Pakistan)

पाकिस्ताने भारतीय धावसंख्येचा पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न केला. हसन नवाजने ९६ धावांची झुंजार खेळी केली. त्याने ५१ चेंडूत पाच चौकार आणि सात षटकार ठोकले. शिवम दुबेने त्याला बाद केले. माझ सदाकतने २३, सलिम आयुबने २९ धावा केल्या. अक्षर पटेल, वॉशिग्टंन सुंदर, शिवम दुबने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (India wins gold in cricket by defeating Pakistan)

Related posts

भैय्या मानेंचा मुश्रीफांना बाय बाय

मलेशियाचा पराभव करत हॉकीत भारताने पटकावले सुवर्ण  

सात गुणांची पिछाडी भरुन काढत सुजीतने पटकावले कुस्तीत सुवर्णपदक