सुरुची, कमलजीतने भारताला मिळवून दिले दुसरे सुवर्ण

Kamaljit and Suruchi win gold at the Asian Championship

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत सुरुची सिंग आणि कमलजीत मिश्र या जोडीने मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्ण पदक आहे. पहिले सुवर्ण पदक भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवले आहे. या स्पर्धेत भारतासाठी नेमबाजीतील हे पहिले सुवर्ण आहे. (Kamaljit and Suruchi win gold at the Asian Championship)

शांत,संयमी आणि एकाग्रतेचा खेळ योग्य निशाना साधत कमलजीत आणि सुरुची या जोडीने अंतिम फेरीत एकूण ४८४.६ गुण मिळवले. दक्षिण कोरियाच्या सुह्योन हाँग आणि गेऊन चू ने रौप्य पदक मिळवले. त्यांनी दुसऱ्या स्थानावर ४७८.० गुण मिळवले. इराणच्या जोडीने ४१५.८ गुणांसह ब्राँझ पदक मिळवले.

हरियाणातील झज्जर गावची १९ वर्षीय सुरुची ही शेतकरी कुटुंबातील आहे. ती घरात शेतीकामातही मदत करते. आज ती विश्वचषकात नसती तर घरी गव्हाची कापणी करत असती असे तिचे प्रशिक्षक सुरेश टी यांनी सांगितले. (Kamaljit and Suruchi win gold at the Asian Championship)

एकीकडे भारतातील स्टार खेळाडूंकडून शुटिंगमध्ये अपेक्षित कामगिरी होत नसताना आज सुरुची आणि कमलजीत यांनी सुवर्णपदक मिळवून दिल्याने भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढण्यास मदत मिळणार आहे. शूटिंगमधील स्कीट प्रकारात भारताने यापूर्वी तीन ब्राँझ पदके मिळवली आहेत. (Kamaljit and Suruchi win gold at the Asian Championship)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव