मलेशियाचा पराभव करत हॉकीत भारताने पटकावले सुवर्ण  

India clinches gold by defeating Malaysia

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवत सुवर्णपदक पटकावले. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने मलेशियाचा ५-१ असा दणदणीत पराभव केला. या सुवर्णपदकाने भारताने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमधील आपले स्थान निश्चित केले. (India clinches gold by defeating Malaysia)

भारताने चार क्वाटरमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या क्वॉटरमध्ये १२ व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. पेनल्टी कॉर्नरवर हरप्रीतसिंगने गोल केला. अवघ्या दोन मिनिटात मलेशियाने १-१ बरोबरी साधून भारताला धक्का दिला. शेलो सिल्वहेरियसने हाफ व्हॉली मारुन चेंडू नेटच्या वरच्या भागात मारला. पहिला क्वॉटर १-१ असा संपला.

दुसऱ्या क्वॉटरमध्ये २३ व्या मिनिटाला भारताला आणखीन एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. जुगराजसिंगने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मारताने मध्यंत्तरापर्यंत टिकवली. (India clinches gold by defeating Malaysia)

तिसऱ्या क्वॉटरमध्ये ४२ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. ५५ व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत ४-१ अशी आघाडी वाढवली.  हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर रॉकेटसारखा शॉट मारत गोल केला. गोलरक्षकाने तटवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार हरमनप्रीतसिंगचा हा दुसरा गोल होता. (India clinches gold by defeating Malaysia)

Related posts

भैय्या मानेंचा मुश्रीफांना बाय बाय

पाकिस्तानला धूळ चारत भारताने क्रिकेटमध्ये जिंकले सुवर्ण

सात गुणांची पिछाडी भरुन काढत सुजीतने पटकावले कुस्तीत सुवर्णपदक