Preity Zinta : कर्णधारपदासाठी श्रेयसलाच पसंती

Preity Zinta

मोहाली : पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला करारबद्ध केल्यापासूनच त्याला कर्णधारपदासाठी पहिली पसंती होती, असे संघाची सहभागीदार प्रिती झिंटाने सांगितले. एक्सवरून (ट्विटर) क्रिकेटप्रेमींच्या प्रश्नांना उत्तर देतानाच तिने श्रेयसची प्रशंसाही केली.(Preity Zinta)

आयपीएलच्या अठराव्या मोसमामध्ये पंजाबचा संघ नऊ सामन्यांअखेर ११ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. शनिवारी पंजाबचा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्या पार्श्वभूमीवर प्रितीने सोमवारी पंजाबच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी आकाश नावाच्या एका युजरने तिचे श्रेयसविषयी माणूस आणि कर्णधार म्हणून असलेले मत विचारले. त्याला उत्तर देताना श्रेयस हा खूप चांगला कर्णधार आणि अतिशय नम्र माणूस असल्याचे ती म्हणाली. (Preity Zinta)

तो पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करतो आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. आयपीएलच्या लिलावामध्ये आम्ही त्याला करारबद्ध करू शकलो आणि संघाच्या कर्णधारपदासाठी तो आमची पहिली आणि एकमेव पसंती होता. त्यामुळे लिलावामध्ये आमचा संपूर्ण सहभाग त्याच्याभोवती केंद्रित होता,” असे प्रिती म्हणाली. कर्णधार व खेळाडू म्हणून श्रेयस व्यूहरचनानिपुण आणि आक्रमक आहे, परंतु मैदानाबाहेर तो अतिशय सौम्य व्यक्ती आहे, अशी पुस्तीही तिने जोडली. (Preity Zinta)

पंजाब-बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामन्यानंतर प्रितीने बेंगळुरूच्या विराट कोहलीशीही संवाद साधला होता. विराटशी काय बोलणे झाले, असे एका युजरने विचारले असता, आम्ही एकमेकांना आमच्या मुलांचे फोटो दाखवले, असे प्रितीने सांगितले. मी अठरा वर्षांपूर्वी विराटला भेटले, तेव्हा तो उत्साही नवतरुण होता. काळ किती वेगात पुढे सरकतो. आजही विराटमधील उत्साह तसाच टिकून असला, तरी आज तो एक प्रेमळ पिताही बनला आहे, असे प्रितीने लिहिले आहे.

हेही वाचा :
बुमराह म्हणतो, मलिंगाच सरस!
एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर