‘पुष्पा’ स्टाईलने मद्य वाहतूक ; ३५ लाखाचे मद्य जप्त

Liquor smuggling, ‘Pushpa’ style

बेळगाव : प्रतिनिधी : मासळी वाहतुकीच्या नावाखाली ओशन फिशर’ नावाच्या कोल्ड स्टोरेज वाहनातून मद्याची वाहतूक करणारे वाहन जप्त करून पस्तीस लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले. पुष्पा चित्रपटाच्या स्टाईलने मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून   बिग बॉस ब्रँडी अबकारी पोलिसांनी  जप्त केली. (Liquor smuggling, ‘Pushpa’ style)

महाराष्ट्र-कर्नाटक  सीमेवर बाची येथे ही कारवाई करण्यात आली. अबकारी पोलिसांची मोठी कारवाई.१८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण ३५० बॉक्स जप्त केले.  ३५.२८ लाख रुपये किमतीचे मद्य आणि २० लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले.  वाहनाच्या बाहेरील भागात मासळीने भरलेले ट्रे ठेवून आतील भागात मद्य लपविण्यात आले होते. अबकारी  पोलिसांनी वाहन अडवताच मद्य  तस्करानी  वाहन सोडून पळ काढला.अबकारी अधिकाऱ्यांच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला. (Liquor smuggling, ‘Pushpa’ style)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंत शिक्षक व सेवक पुरस्कारांची घोषणा

आता कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार

दिवाळीत  एसटीची १६ दिवसांत ५४८ कोटींची कमाई