आता कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार

Pro-Vice-Chancellors can now be removed

मुंबई : प्रतिनिधी :  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात अध्यादेशाव्दारे सुधारणा करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार आहे.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. (Pro-Vice-Chancellors can now be removed)

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम १ मार्च २०१७ पासून अंमलात आहे. या अधिनियमात विद्यापीठाशी निगडीत विविध विषयांकरिता तरतूद करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात झालेल्या बदलाच्या अनुषंगाने अधिनियमात करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार अधिनियमातील कलम १३(१२) आणि कलम १००(५)(अ) यामध्ये सुधारणा करण्याच्या अध्यादेशाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली. (Pro-Vice-Chancellors can now be removed)

कलम १३(१२) मधील सुधारणेमुळे राज्याच्या कुलपती यांना संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या शिफारशीवरून प्र-कुलगुरू यांना हटविता येणार आहे. तर  १००(५)(अ) मध्ये विद्यापीठाशी निगडीत बांधकाम व विकसनाचे काम यापुढे व्यवस्थापन परिषदेच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करता येतील अशी सुधारणा केली जाणार आहे. या अध्यादेशाच्या प्रारूपात आवश्यक बदल करण्याचे अधिकार विधि व न्याय विभागास देण्यात आले. (Pro-Vice-Chancellors can now be removed)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंत शिक्षक व सेवक पुरस्कारांची घोषणा

‘पुष्पा’ स्टाईलने मद्य वाहतूक ; ३५ लाखाचे मद्य जप्त

दिवाळीत  एसटीची १६ दिवसांत ५४८ कोटींची कमाई