Gun salute at Ambabai Temple : तोफेच्या सलामीने कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

Gun salute at Ambabai Temple

कोल्हापूर : प्रतिनिधी : मानाची तोफ उडवून सलामी दिल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दहा दिवस उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी देवीची आराधना केली जाणार आहे. मंदिर फुलांनी सुशोभित केले असून आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचे कळस व परिसर झळाळून गेला आहे. (Gun salute at Ambabai Temple)

अश्विन शुद्ध प्रतिपदेदिवशी सकाळी नऊ वाजता मानकरी जाधव कुटुंबियांच्यावतीने धनाजी जाधव यांनी तोफेला बत्ती दिली. तोफ उडवून सलामी दिल्यानंतर मंदिरात शेखर मुनीश्वर यांनी घटनास्थापना केली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतील अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीवर शासकीय अभिषेक झाला. (Gun salute at Ambabai Temple)

दरम्यान पहाटे चार वाजताच मंदिराचे दरवाजे खुले झाले. दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरातील महिला वर्गाने पहाटे चार वाजताच दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्राच्या पहाटेच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने दर्शन रांग भरली होती. मंदिरात सर्वत्र फुलांची आरास केली असून सर्वत्र मंगलमय वातावरण झाले आहे. सध्या गरुड मंडपाचे काम सुरू असून त्यावर मंडप उभारण्यात आला आहे. त्याच ठिकाणी सुवर्णपालखीची व्यवस्था केली जाणार आहे. पुढील दहा दिवस रोज रात्री नऊ वाजता पालखी सोहळा होणार आहे. (Gun salute at Ambabai Temple)

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगाची सोय केली आहे. दर्शन रांगेसाठी शेतकरी बाजाराच्या तळमजल्यात व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणपती चौकातून मुखदर्शनाची सोय केली आहे. सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दसरा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. (Gun salute at Ambabai Temple)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर