Girish Mahajan : गिरीश महाजन दलाल : राऊतांची टीका

Girish Mahajan

मुंबई : प्रतिनिधी : भाजप हा एकेकाळी पवित्र, नीतीवान, हिंदुत्ववादी, सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनेजहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व करत पक्ष सांभाळला, पक्ष वाढवला. आज या पक्षाची सूत्रे दलाल, भ्रष्ट, ठेकेदार यांच्याकडे आहेत. मंत्री गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ही जमीनदोस्त होणार आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. त्याला खासदार राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. (Girish Mahajan)

शिवसेना संपवणे कोणालाही शक्य नाही. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचा स्वत:चा पक्ष जमिनीवर आहे का याचा अभ्यास करावा. महाजन यांच्या दहा पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवणे शक्य नाही. महाजन यांच्या दहा पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवणे शक्य नाही, असेही खासदार राऊत यांनी भाजपला सुनावले.  

देशातील सर्व भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी लोकांना एकत्र घेत झालेला पक्ष आजचा भाजप आहे, अशी त्यांनी टीका केली. त्यांच्या हातात पोलिस, सरकारी यंत्रणा आहेत. टेंडरबाजी, खंडणीतून प्रचंड पैसा आला आहे. त्याच्या जोरावर लोकांना धमकावणे, पक्ष फोडणे असे त्यांचे कारस्थान सुरू आहे. त्या कामासाठी नेमलेल्या दलालांमधील गिरीश महाजन हे एक आहेत, अशी टीका त्यांनी केली. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल तेव्हा पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल अशी भविष्यवाणी राऊत यांनी केली. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांच्या चौकशा सुरू असताना ते पक्ष बदलण्यासाठी तयार होते. त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर प्रकरणांच्या चौकशा सुरू असताना त्यांचे निरोप येत होते. आपण राजकारणातून बाहेर पडतो, आपण शांत बसतो अशा ते विनवण्या करत होते. (Girish Mahajan)

शिवसेनेने नाडी बांधायला शिकवली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना नाडी बांधायला शिकवले. राजकारणात त्यांना ओळख मिळवून दिली. त्या शिवसेनेला आज ते जमीनदोस्त करण्याची भाषा वापरत आहेत, गिरीष महाजन जी भाषा वापरत आहेत तीच भाषा त्यांना त्यांच्या पक्षाला घेऊन बुडणार आहेत अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली. (Girish Mahajan)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर