Fadnavis’ determination : राज्यात १०० टक्के त्रिभाषा सूत्र लागू करणारच : फडणवीस

Fadnavis' determination

मुंबई : प्रतिनिधी : इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांना विरोध हा मी सहन करणार नाही. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. ‘मुंबई तक ’ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्रिभाषा सूत्र या विषयावर सविस्तर आणि रोखठोक भूमिका मांडल्याने पुन्हा एका हिंदी सक्तीचा विषय ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Fadnavis’ determination)

पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्यातील मनसे, शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, साहित्यीक, कलाकारांनी विरोध केल्यानंतर महायुती सरकारने त्रिभा सुत्राबाबत दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा केली. तसेच याबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली. (Fadnavis’ determination)

‘मुंबई तक’च्या विशेष कार्यक्रमाच्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने त्रिभाषासूत्र स्वीकारले असून त्याचा अहवाल तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने स्वीकारला होता. पण नंतर मात्र त्यांनी पलटी मारल्याचा टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले, पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर निघाला. त्याला विरोध झाल्यावर जीआर बदलला. हिंदीऐवजी अन्यथा इतर कुठलीही भाषा घ्या परंतु त्यासाठी किमान २० विद्यार्थी हवेत. दोन विद्यार्थ्यांना तेलगू शिकायचे असेल त्यासाठी शिक्षक कुठुन आणायचे. ते प्रॅक्टिकली शक्य नाही. इयत्ता तिसरीतील विद्यार्थी त्या वयात विविध भाषा शिकू शकतो. या भाषा शिकल्याने विद्यार्थ्याचा आकलन शक्तीचा विस्तार होतो. विदयार्थ्याचा बौद्धिक विस्तार होत असल्याने अभ्यास समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारने शिक्षणात तिसऱ्या भाषेची शिफारस केली आहे. (Fadnavis’ determination)

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्रिभाषा सुत्रावर वेगवेगळी मते आल्यानंतर आम्ही समिती नेमली आहे. समितीचा अहवालानंतर आम्ही निर्णय घेऊ. आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय नाही. एक गोष्ट निश्चित सांगतो. त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होईलच. ते पहिलेपासून होईल की पाचवीपासून हे समिती ठरवेल मात्र १०० टक्के त्रिभाषा सूत्र आम्ही महाराष्ट्रात लागू करु असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर