Israel attck Syria : इस्त्रायलचा सिरियावर हल्ला

Israel attck Syria

दमास्कस : गाझा पट्टी, इराणनंतर इस्त्रालयने आता सिरियावर मोर्चा वळवला आहे. इस्त्रालयने बुधवारी दमास्कसवर खोलवर हल्ले केले. ज्यामध्ये  सीरियाचे लष्करी मुख्यालय आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळील एका जागेला लक्ष्य करण्यात आले.  दक्षिण सीरियामध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीरियातील ड्रुझ अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले. (Israel attck Syria)

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) नुसार, लष्कराने सीरियन जनरल स्टाफ कंपाऊंडच्या प्रवेशद्वारावर आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळील “लष्करी लक्ष्यावर” हल्ला केला. सीरियन आरोग्य मंत्रालयाने दमास्कस हल्ल्यात किमान एकाचा मृत्यू आणि १८ जखमी झाल्याची पुष्टी केली.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दमास्कसला “स्वेदा येथील ड्रुझना एकटे सोडण्याचा” इशारा दिला आणि सीरियन सैन्याने या प्रदेशातून माघार घेतली नाही तर प्रखर हल्ले करण्याची धमकी दिली. सिरीयाचा प्रतिहल्ला होण्याची शक्यता लक्षात घ्घ्ऊन इस्रायली सैन्याला गाझा येथून सीरियाच्या सीमेवर पुन्हा तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. (Israel attck Syria)

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या भूमिकेला दुजोरा देत म्हटले की, इस्रायली भूभाग आणि इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या ड्रुझ समुदायाचे रक्षण करण्यासाठी दक्षिण सीरियाचे निशस्त्रीकरण राहिले पाहिजे.

या आठवड्याच्या प्रारंभी ड्रुझ बहुल स्वीडा शहरात ड्रुझ सशस्त्र गट आणि सीरियन सरकारी सैन्यात संघर्ष सुरू झाला. साक्षीदारांनी असा दावा केला की सीरियन सैन्याने युद्धबंदी लागू करण्याऐवजी ड्रुझ सैनिक आणि नागरिकांविरुद्ध बेदौइन जमातींची बाजू घेतली. युकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईट्सने रविवारपासून स्वेइडा प्रांतात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे, ज्यामध्ये सीरियन सैन्याने कथितपणे २७ ड्रुझ नागरिकांचा समावेश आहे. व्हिडिओ आणि फोटोमध्ये घरे लुटली गेली आणि ड्रुझ धार्मिक व्यक्तींवर अत्याचार झाल्याचे दिसून आले. (Israel attck Syria)

सीरियाच्या सरकारी माध्यमांनी बुधवारी पुन्हा एकदा युद्धबंदीची घोषणा केली, ज्यात स्वेदा शहरात सुरक्षा चौक्या तैनात करण्यात आल्या. तथापि, तुरळक गोळीबार सुरूच राहिला, ज्यामुळे युद्धबंदीच्या प्रभावीतेवर शंका निर्माण झाली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर