Election Commission is ‘ten-numbered : निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’ : हर्षवर्धन सपकाळ

Election Commission is 'ten-numbered

 जमीर काझी : मुंबई :  मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असलेतरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही?  आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Election Commission is ‘ten-numbered)

टिळक भवन येथे  त्यांच्या  अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. १२ व १३ नोव्हेंबरला प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार असून या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष  सपकाळ म्हणाले की, मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे, या मतचोरी विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु निवडणूक आयोग मात्र यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. (Election Commission is ‘ten-numbered)

‘ शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची वास्तवदर्शी व्यथा मांडणारे “कर्जबाजारी हे घर तुझ्या लेकराचे” हे अत्यंत भावस्पर्शी गीत आज रिलीज करण्यात आले. विजय मुंडाले आणि अर्जुन युवनाते हे हे या  गीतकार आणि निर्माते आहेत तर मनीष राजगिरे हे गायक आहेत. 

कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीसह इतर आवश्यक मदत करण्याची मागणी यावेळी सपकाळ यांनी केली. कर्जबाजारी हे घर तुझ्या लेकराचे या गीताच्या माध्यमातून गीतकार देखील सरकारला आवाहन करीत आहेत.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष तथा गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार डॉ. कल्याणराव काळे, खासदार रविंद्र चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, मोहन जोशी उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील आदी उपस्थित होते. (Election Commission is ‘ten-numbered)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर