Alliance after elections : तिन्ही पक्ष वेगळे लढले तरी निवडणूकीनंतर युती होणार : मुख्यमंत्री फडणवीस

Alliance after elections

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरी निवडणूक निकालानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र येऊन युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Alliance after elections)

मुख्यमंत्री फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मुंबईहून कोल्हापूरातील उजळाईवाडी विमानतळावर उतरल्यावर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा दावा त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. मात्र कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघे एकत्रच आहोत. कुठे युती झाली नाही तरी, निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येऊन युती होईल.’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महायुतीलाच कौल देईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Alliance after elections)

मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर नाराजी व्यक्त केली आहे यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे घराबाहेर पडले ही चांगली गोष्ट आहे. त्यांना टोमणे मारण्याशिवाय काही जमत नाही. त्यांनी विकासावर केलेले एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे मी आधीच म्हटलेले आहे असेही ते म्हणाले. (Alliance after elections)

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर संताप व्यक्त केला आहे याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे. ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपेक्षित नाही. पण सर्वोच्च  न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर