Declining Economy: मोदी सरकारच्या दडपशाहीमुळे गुंतवणुकीला खीळ : काँग्रेस

Indian Economy

नवी दिल्ली : मोदी सरकारची दडपशाही आणि त्याच दडपशाहीच्या धोरणांमुळे गुंतवणुकीतील वाढीला खीळ बसली आहे, असा आरोप करत काँग्रेसने शनिवारी (२८ जून) नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. (Declining Economy)

‘‘अमृत काळातील बचत कमी झाली आहे आणि घरगुती खर्चावर अंकुश लावण्यात आला आहे,’’ असा दावा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये केला आहे.

बचत खात्यावरील व्याजदर गेल्या २५ वर्षांतील सर्वांत कमी आणि घरगुती बचत ५० वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे. गेल्या तीन वर्षांत त्यात सातत्याने घट होत आहे, असा आरोप खरगे यांनी केला.

“मोदी सरकारने जनतेचे खिसे कापण्याचे कंत्राट घेतल्यासारखी सर्व देशभर स्थिती आहे,’’ अशी टीकाही खरगे यांनी केली. (Declining Economy)

दरम्यान, भारताची आर्थिक वाढ खुंटली आहे, असा आरोप काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनी एका वेगळ्या पोस्टमध्ये केला आहे.

“या अपयशाचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये उदार कर कपात आणि पीएलआय धोरण आहे. खाजगी कॉर्पोरेट गुंतवणूक मंदावलेली आहे. मोदी सरकारनेच केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून येते की खाजगी क्षेत्रातील भांडवली खर्च मागील वर्षाच्या तुलनेत २०२५/२६ मध्ये २५% कमी असू शकतो,” याकडे रमेश यांनी लक्ष वेधले. (Declining Economy)

बँका कर्ज देण्यास तयार होत्या, पण कंपन्या कर्ज घेण्यास तयार नव्हत्या. कारण गुंतवणुकीसाठी वातावरण अनुकूल दिसत नाही, असे त्यांनी जाणकार विश्लेषकांचा हवाला देऊन म्हटले आहे.

‘‘कर दहशतवादामुळे कहर झाला आहे. काही विशिष्ट व्यक्तींकडून व्यवस्थेचा खेळ सुरू आहे. मोठ्या कॉर्पोरेट जगात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकस्नेही वातावरण राहिलेले नाही. शेवटी, गुंतवणूक मंदी हा मोदी सरकारच्या दडपशाही आणि दडपशाहीच्या धोरणांचा अपरिहार्य परिणाम आहे,’’ असे रमेश म्हणाले.

हेही वाचा :
कलम ३७० आंबेडकरांच्या विचारांविरोधात : सरन्यायाधीश
अंतराळवीर शुक्ला यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर