PM Interacts With Shubhanshu: अंतराळवीर शुक्ला यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद

PM Interacts With Shubhanshu

नवी दिल्ली : अंतराळवीर आणि अ‍ॅक्सिओम-४ चे पायलट शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला. ‘‘अंतराळातून भारत खरोखरच भव्यदिव्य दिसतो,’’अशा भावना शुक्ला यांनी व्यक्त केल्या. या दोघांच्या संवादाने भारताने एक वेगळाच क्षण अनुभवला. (PM Interacts With Shubhanshu)

४१ वर्षांपूर्वी अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, अंतराळातून भारत कसा दिसतो असे विचारले तेव्हा शर्मा यांनी ‘‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा,’’ असे म्हटले होते.

शर्मा २ एप्रिल १९८४ रोजी प्रक्षेपित झालेल्या सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी-११ मोहिमेत सहभागी झाले होते. अंतराळवीरांनी मॉस्कोमधील अधिकाऱ्यांसह संयुक्त टेलिव्हिजन पत्रकार परिषदेत अंतराळातून इंदिरा गांधींशी संवाद साधला.

शुक्ला यांनी एक पाऊल पुढे जात अंतराळातून दिसणाऱ्या भारताचे वर्णन करताना, ‘‘एकता’’ आणि ‘‘विविधतेत एकता’’ हा संदेश दिला. (PM Interacts With Shubhanshu)

‘‘मी जेव्हा पहिल्यांदाच अंतराळातून भारत पाहिला तेव्हा खरोखरच उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारत खरोखरच भव्यदिव्य दिसतो. नकाशांवर आपण जे पाहतो त्यापेक्षा खूप मोठा दिसतो. आपल्या वरून भारत पाहताना ‘विविधतेत एकता’ या बोधवाक्याची प्रचिती येते. पृथ्वीने दिलेली एकतेची भावना खोलवर अर्थपूर्ण बनते,’’ असे शुक्ला पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना म्हणाले.

‘‘या दृष्टिकोनातून पाहिले असता सीमा, राज्ये आणि देशापलीकडे आपण सर्व मानवतेचा भाग आहोत आणि पृथ्वी हे आपले सर्वाँचे एक घर आहे. आपण सर्व तिचे नागरिक आहोत ही भावना अधिक दृढ होते,’’ असे ते पुढे म्हणाले.

शुक्ला म्हणाले की, हा प्रवास त्यांचा एकट्याचा नाही तर संपूर्ण राष्ट्राचा आहे. पंतप्रधान मोदी, तुमच्या शुभेच्छा आणि १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी येथे अगदी सुरक्षित आहे. मला खूप चांगले वाटत आहे, हा एक नवीन अनुभव आहे. हा प्रवास केवळ माझा नाही तर संपूर्ण देशाचा प्रवास आहे. (PM Interacts With Shubhanshu)

ग्रुप कॅप्टन शुक्लासह अ‍ॅक्सिओम-४ (अ‍ॅक्स-४) क्रू घेऊन जाणारे ड्रॅगन कॅप्सूल गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या उतरले. शुक्ला हे अंतराळकक्षेत प्रवेश करणारे पहिले भारतीय ठरले आहे. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

सोव्हिएत सोयुझ टी-११ वरून विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक मोहिमेनंतर ४१ वर्षांहून शुक्ला अंतराळकक्षेत जाणारे पहिले भारतीय आहेत.

हेही वाचा :
कलम ३७० आंबेडकरांच्या विचारांविरोधात : सरन्यायाधीश
संविधानाची प्रस्तावना आणीबाणीवेळी बदलली : धनकड

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर