कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत लागलेल्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवला. त्यांना अपक्ष उमेदवार विजय साळोखे सरदार यांनी कडवी झुंज दिली. काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकरही विजयी झाले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. सतेज पाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेऊन विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर माधुरी गवंडी आणि अदिल फरास विजयी झाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भाजपने मोठे आव्हान दिले असून प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग तीन मधून भाजपचे चार मध्ये चारही उमेदवार विजयी झाले. प्रारंभीच काँग्रेस आणि भाजपने विजयाचा चौकार मारला आहे.
प्रभाग तीन मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक आणि विजेंद्र माने विजयी झाल्याने भाजपने विजयाचा चौकार ठोकला. प्रभाग क्रमांक १ मधून कॉग्रेसचे सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार धामोडकर सचिन चौगुले हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. (Congress and BJP’s winning streak of four)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने ६६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना विरुद्ध्द भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी थेट लढत आहे. या निवडणुकीत विधान परिषदेतेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक या सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. . (Congress and BJP’s winning streak of four)
प्रभाग नऊ मध्ये भाजप शिवसेनेची बाजी
प्रभाग नऊ क्रमांक मध्य भाजप शिवसेनेने बाजी मारली आहे. भाजपचे विजय रिंकू देसाई, भाजपच्या माधवी पाटील, शिवसेनेच्या संगीत सावंत, आणि शाररंगधर देशमुख विजयी झाले. एकेकाळचे आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करत विजय संपादन केला. देशमुख आणि माजी नगरसेवक राहूल माने यांच्या काटाजोड लढतीत शारंगधर देशमुख यांनी तब्बल तीन हजार मतांनी विजय मिळवला.
आमदार क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज विजयी
प्रभाग क्रमांक सातकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय संपादन केला. क्षीरसागर यांची अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांच्याशी लढत होती. या प्रभागात भाजपचे विशाल शिराळे, दीपा ठाणेकर, शिवसेनेच्या मंगल साळोखे हे उमेदवार विजयी झाल्या.
जनसुराज्यने खाते खोलले
प्रभाग दहा मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने खाते खोलले. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या अक्षय जरग यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख रवीकिरण इंगवले यांचे बंधू राहूल इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक महेश सावंत यांचा पराभव केला. भाजपच्या अर्चना कोराणे, पूर्वा राणे, शिवसेना शिंदे गटाचे अजय इंगवले विजयी झाले.
प्रभाग दहा मध्ये फिफ्टी फिफ्टी
प्रभाग बारामधून काँग्रेस आणि महायुतीला समिश्र यश मिळाले आहे. या प्रभागात शिवसेनेचे अश्कीन आजरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अदिल फरास विजयी झाले आहेत. माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे अश्कीन आजरेकर हे पती आहेत. काँग्रेसच्या स्वालिया बागवान आणि अनुराधा मुळीक विजयी झाल्या आहेत. आजरेकर कुटुंबिय हे पूर्वीश्रमीचे सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन विजय संपादन केला.
प्रभाग चारमध्ये राजेश लाटकरांसह काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
प्रभाग चार मध्ये माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा विजय झाला. लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण ते राजेश क्षीरसागर यांच्याकडून पराभूत झाले होते. या प्रभागात स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे हे उमेदवार विजयी झाले आहेत. लाटकर यांनी प्रभाग चारमध्ये काँग्रेसचा गड राखला आहे.
प्रभाग् १६ मध्ये फिफ्टी फिफ्टी.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप आणि काँग्रेसला फिफ्टी फिफ्टी यश मिळाले आहे. काँग्रेस उमेदवार उमेश पवार, धनश्री कोरवी. भाजपचे उमेदवार पूजा पोवार, मुरलीधर जाधव विजयी झाले आहेत. मुरलीधर जाधव हे माजी नगरसेवक आहेत.
प्रभाग २ मध्ये शिवसेनेचा बाण सुसाट
प्रभाग दोन मध्ये शिवसेनेचा बाण सुसाट सुटला आहे. या प्रभागात चारही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात काँग्रेसला डोके वर काढून दिले नाही. वैभव माने, अर्चना पागर, प्राजक्ता जाधव आणि स्वरुप कदम विजयी झाले आहेत. माजी महापौर सुनील कदम यांचे स्वरुप कदम हे चिरंजीव आहेत.