CM order for compensation :  शेतकऱ्यांना २१०० कोटी रुपये नुकसानभरपाई : मुख्यमंत्री फडणवीस

CM order for compensation

मुंबई : प्रतिनिधी :  अतिवृष्टी, ढगफुटी  सदृश्य पावसाने राज्यात ७० लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झाले असून नुकसानपोटी २१०० कोटी रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. (CM order for compensation)

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता त्यांना दिवाळीआधी नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बुधवारी सकाळीच सांगितले होते. यानंतर आता राज्य सरकारने जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना कोटींची मदत जाहीर केली असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर झाला आहे. तसेच बुधवारपासून (२४  सप्टेंबर) सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करावे, असे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. (CM order for compensation)

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतीपिकांच्या नुकसानापोटी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देतेाना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात ७०लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झालं आहे आणि यासाठी २१०० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेशही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. (CM order for compensation)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना एक हजार ३३९ कोटी रुपयांची मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात राज्य सरकारकडून आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच सर्व मंत्र्यांना बुधवारपासून (२४ सप्टेंबर) नुकसानग्रस्त भागाचे दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून ते तेथील पूरपरिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जात आहेत. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे जसे होतील, तशी तातडीने मदत दिली जाईल. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही. तसेच राज्य सरकारने आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत. यापैकी १८२९ कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (CM order for compensation)

Related posts

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी