Arun Dongle : गोकुळचे माजी अध्यक्ष डोंगळेचा राष्ट्रवादीत प्रवेश

Arun Dongle

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यकर्त्यांसह मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे सचिव आमदार शिवाजी गर्जे यांच्यासह आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी राधानगरी तालुक्याच्या प्रत्येक गावातून अरुण डोंगळे यांचे प्रमुख समर्थक उपस्थित होते. (Arun Dongle)

पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले,  गोकुळ दूध संघामध्ये संचालक, चेअरमन म्हणून काम करत असताना अरुण डोंगळे यांनी नेहमीच शेतकरी आणि दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. दूध उत्पादकांच्या हिताच्या योजना राबवल्या सहकार समाजकारण राजकीय क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील  प्रवेशामुळे पक्षाची ताकत कैक पटीने वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या संघटना आणि शक्ती वाढण्यात डोंगळे यांचे संघटन कौशल्य उपयुक्त ठरणार आहे. आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरुण डोंगळे यांचा योग्य सन्मान राखेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. (Arun Dongle)

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अरुण डोंगळे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात १०० हत्तींचे बळ मिळाले आहे. डोंगळे यांच्या प्रवेशाचा पक्षाला सहकाराबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे.

यावेळी आमदार ईद्रिस  नायकवाडी, आमदार संजय खोडके, आनंद परांजपे, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित होते. या प्रवेशाने राधानगरी व भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादी आणखी मजबूत होण्यास बळ मिळणार आहे. यावेळी गोकुळ संचालक रणजितसिंह पाटील, किसन चौगुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भोगावती साखर कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजाराम भाटळे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिंगबर मेडशिंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे, सम्राट डोंगळे, संदीप डोंगळे, युवा शक्ति अध्यक्ष सुहास डोंगळे उपस्थित होते. (Arun Dongle)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर