मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची आरपारची लढाई लढण्यासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात भाजपने आघाडी उघडली आहे. जरांगेचा मोर्चा मुंबईत पोहोचण्यापूर्वी मोर्चाच्या मार्गावर आणि मुंबईत भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून जोरदार बॅनरबाजी केली आहे. जरांगे पाटील यांनी वारंवार फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यांना दिलेले आव्हान यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहेत. गुरुवारी सायंकाळी जरांगे मुंबईत पोहोचणार आहेत. तर शुक्रवारी २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास बसणार आहेत. उच्च न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली असली तरी जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. (Banners from BJP)
मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम पारनेरमध्ये केला. या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यामुळे आज त्यांचा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. पण त्यांचा हा मोर्चा मुंबईत पोहोचण्याआधी भाजपाकडून एक्सपेस हायवे आणि दादर परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील या भाजपाच्या नेत्यांनी ही बॅनरबाजी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर, उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असेही भाजपाकडून या बॅनरच्या माध्यमातून आवर्जून सांगण्यात आले आहे. (Banners from BJP)
या बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असून “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” असा लक्षवेधी मजकूर लिहिलेले लागले बॅनर झळकले आहेत. ही बॅनरबाजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व आहे. जरांगे पाटील यांनी वारंवार फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यांना दिलेले आव्हान यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहेत. (Banners from BJP)
दादर स्टेशन परिसरात मराठा आरक्षणावरून राजकीय बॅनरबाजी
– मनोज जरांगेंच्या मुंबई कूच दरम्यान फडणवीसांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
– मुंबईतील दादर परिसरात मराठा आरक्षणावरून राजकीय बॅनरबाजी सुरू झाली आहे.
– या बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असून “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” असा लक्षवेधी मजकूर लिहिलेले लागले बॅनर
– या बॅनरमध्ये फडणवीस यांना “मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे” आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणून गौरवण्यात आले आहे.
– ही बॅनरबाजी भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
– ही बॅनरबाजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व आहे.
– मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच केली असून, ते २९ तारखेला आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत
– जरांगे पाटील यांनी वारंवार फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यांना दिलेले आव्हान यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहेत.