अजित पवारांवरील आरोपांबद्दल अमित शाहांनी माफी मागायला हवी होती

Amit Shah should apologize to Ajit Pawar

नवी दिल्ली : अमित शाहांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळा, जरंडेश्वरचा घोटाळा असे खोटे आरोप केले होते. काल पुण्यात अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यापूर्वी अमित शाहांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांबद्दल माफी मागायला हवी होती, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवारांच्या विमान अपघातात काहीच काळेबेरे नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादांच्या मृत्यूच्या संशयाबद्दल एफआयआर का दाखल केला नाही? असा प्रश्न  उपस्थित केला आहे. (Amit Shah should apologize to Ajit Pawar)

काल सोमवारी पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर माजी उप मुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अर्धकृती पुतळ्याचे उद्घाटन अमित शाह यांच्या झाले. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यावर आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अमित शाहांवर टीका केली.

उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका

उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार हयात असताना त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यांचे आरोप करुन त्यांचे जगणे मुश्किल करण्यात आले होते. पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी अमित शाहांनी पुतळ्यासमोर माफी मागायला हवी होती आणि केलेले आरोप खोटे होते असे म्हणायला हवे होते. अशी टीका केली.

अजित पवारांच्या पुतळ्यासमोर आलेला उमाळा म्हणजे ढोंग होते

संजय राऊत म्हणाले, अमित शाहांना पुण्यात अजित पवारांच्या पुतळ्यासमोर जो उमाळा आला होता ते पुर्णपुणे ढोंग होते. शाहांनीच अजित पवारांना पक्ष सोडण्यासाठी कोंडी केली. त्यांनी ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, जरंडेश्वर घोटाळा असे खोटे आरोप केले. काल पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी अमित शाहांनी या आरोपांबद्दल माफी मागायला हवी होती अशी अशी कडाडून टीका केली. अजितदादा महायुतीत मनाने गेले नव्हते. त्यांना धमक्या देऊन ओढून आणले होते. त्यांच्यावर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स आणि अटकेची टांगती तलवार ठेवली होती. अमित शाह आणि फडणवीसांकडे कोणीही मनापासून येत नाहीत. त्यांचे नाते फक्त बिल्डर आणि भ्रष्टाचाऱ्यांशी आहे, अशी टीका केली. (Amit Shah should apologize to Ajit Pawar)

विमान अपघातात काळेबेरे नसेल तर एफआयआर का दाखल केला नाही?

खासदार राऊत यांनी आमदार रोहित पवारांचे कौतुक करत त्यांची पाठराखण केली. ते म्हणाल, ज्या विमान कंपनीच्या मालकाचे विमान वापरले त्यामध्ये काहीतरी गडबड होती. रोहित पवारांनी काल पुराव्यानिशी तो मफलर मॅन पडद्यावर दाखवला. मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या लग्नात मफलर घेऊन जाण्याचे कारण काय त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले पाहिजे. पण ते करत नाहीत. अजित दादांच्या विमान अपघातात काही काळेबेरे नसेल तर एफआयआर दाखल करुन योग्य तपास का केला जात नाही. असा सवाल संजय राऊत यांनी केला. अजितदादांच्या रहस्यमय मृत्यूमध्ये जे काही सुत्र आणि पात्र आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत, अशी टीका केली. (Amit Shah should apologize to Ajit Pawar)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंत शिक्षक व सेवक पुरस्कारांची घोषणा

‘पुष्पा’ स्टाईलने मद्य वाहतूक ; ३५ लाखाचे मद्य जप्त

आता कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार