महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलला अलविदा ; आता सीएसकेचा मेंटॉर

Mahendra Singh Dhoni retires from the IPL

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज संघांचे नेतृत्व करत संघाला विजेतेपदे पटकावून देणारा महेंद्रसिंग ढोणी आगामी आयपीएल क्रिकेट हंगामामध्ये संघाकडून पिवळ्या रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरणार नाही. एक खेळाडू म्हणून त्याचा आयपीएलमधील प्रवास संपला असून त्याच्याकडे संघाच्या मेंटॉरपदाची जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा सीएसकेने केली आहे. (Mahendra Singh Dhoni retires from the IPL)

भारतीय संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये विश्वचषक पदके मिळवून देणाऱ्या कॅप्टन कुल धोनीने सीएसके याला त्याच्या नेतृत्वाखाली पाच विजेतेपदे मिळवून दिली आहेत. आता तो मैदानात संघाला मार्गदर्शन करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोणीबाबत आज अधिकृत त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याबाबत सीएसकेने अधिकृत पोस्ट केली आहे. “धोनीसारखा खेळाडू पुन्हा होणे शक्य नाही. त्याची नवी भूमिका असली तरी संघाबरोबरचं त्याचं नातं कायमचं आहे. असंख्य विजय, कठीण प्रसंग आणि अविस्मरणीय आठवणीच्या प्रवासात धोनी सुरवातीपासून चेन्नई सुपर किंग्जच्या केंद्रस्थानी राहिला आहे.”. “संघाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून ते आता नव्या पिढीतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापर्यंत धोनीची भूमिका महत्वाची राहणार आहे. ‘थाला’ नेहमीच चेन्नई सुपर किंग्जच्या ओळखीचा अविभाज्य भाग असेल आणि चेन्नई हे कायमचं त्याचं घर राहील” अशा शब्दात फ्रँचयझीने धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Mahendra Singh Dhoni retires from the IPL)

आयपीएलमधील धोनीची कारकीर्द :

एकूण सामने २७८, एकूण धावा ५४३९, आयपीएल विजेतेपदे २०१०, २०११,२०१८,२०२१,२०२३. यष्टीरक्षक कामगिरी १५८ झेल, ४७ यष्टीचित. (Mahendra Singh Dhoni retires from the IPL)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंत शिक्षक व सेवक पुरस्कारांची घोषणा

‘पुष्पा’ स्टाईलने मद्य वाहतूक ; ३५ लाखाचे मद्य जप्त

आता कुलगुरुंच्या शिफारशीवरुन प्र-कुलगुरुंना हटवता येणार