Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. यासह देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत ‘इंडिया’ आघाडी तर विधानसभेत ‘मविआ’ आक्रमक झाली आहे. (Amit Shah)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीतील खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले. संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ इंडिया आघाडीने निषेध व्यक्त केला. आंदोलनात सहभागी झालेल्या खासदारांनी निळ्या रंगाचा पोशाख परिधान केले होते. यावेळी खासदारांनी ‘I am Ambedkar’, ‘मैं भी अंम्बेडकर’असे फलक घेऊन जोरदार निदर्शने केली. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरा यांच्या वक्तव्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागत राजीनामा द्यावा अशी मागणी खासदारांनी केली. यावेळी संसदेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य इंडिया आघाडीतील खासदार उपस्थित होते.

राज्य विधिमंडळात तीव्र पडसाद

गृहमंत्री अमित शहा यांच्या संसद सभागृहातील वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही दिसून आले. अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी संविधान चौक ते विधानभवनापर्यंत निषेध रॅली काढली. यावेळी महाविकासा आघाडीच्या आमदारांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी निळा रंगाची टोपी आणि निळ्या रंगाचे स्कार्फ परिधान केले होते. . यावेळी मविआचे आमदार उपस्थित होते. (Amit Shah)

गृहमंत्री अमित शाहांनी आरोप फेटाळले

संसदेत मी केलेले वक्तव्यसंसदेच्या रेकॉर्डवर आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही. मी किंवा माझा पक्ष स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही, असे स्पष्टीकरण देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली