मुंबई : प्रतिनिधी : शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने त्यांनी भाष्य केले आहे. (Ajit Pawar will join the MVA)
नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पण दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत. तसेच शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवारही तुतारी ऐवजी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत या प्रश्नांवर खासदार राऊत म्हणाले, शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. कारण, शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीत आहे. तरीही त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे. अशावेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल. त्यामुळे मला अशी खात्री आहे की, भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित तुम्हाला महाविकास आघाडीत दिसतील, असा दावा राऊत यांनी केला. (Ajit Pawar will join the MVA)
अजित पवार हे दोन दगडावर पाय कसे ठेवणार? त्यांना काही तरी एक सोडावे लागेल किंवा काही तरी एक स्वीकारावे लागेल. मेलेले मेंढरू आगीला भीत नाही. अजित पवारांना एकदा या सर्व घोटाळ्यात क्लीन चिट दिली आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले. त्यामुळे कोणत्या तोंडाने त्यांची फाईल ओपन करण्यात येईल? त्या फाईलमध्ये काही आहे की नुसता पोकळ डरकाळ्या फोडत आहेत असेही राऊत म्हणाले. छगन भुजबळ यांच्याविरोधात मोठे आरोप झाले. ते अडीच वर्ष तुरुंगात राहिले. पण आज भुजबळ यांना सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून ईओडब्ल्यूपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृहखात्याने आणि ईडीने प्रायश्चित घेतले पाहिजे असेही ते म्हणाले. (Ajit Pawar will join the MVA)