टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  बांगलादेश आऊट, स्कॉटलंड इन

Bangladesh out, Scotland in

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील सामने भारताबाहेर खेळवावेत अशी मागणी बांगलादेश सरकार आणि बांगलादेश क्रिकेट संघटनेने केली होती. आयसीसीने त्यांची मागणी नाकारत बांगलादेशऐवजी स्कॉटलंड समावेश स्पर्धेत केला आहे. (Bangladesh out, Scotland in)

क गटात स्काटलंड हा संघ इटली, नेपाळ, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांबरोबर सामने खेळेल. सुरक्षिततेच्या कारणावरुन भारतात येण्यास बांगलादेशने सातत्याने नकार दिल्याने स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.

सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशचे सामन्यात भारताऐवजी श्रीलंकेत खेळवावे अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केली होती. पण भारतामध्ये बांगलादेश संघाला कोणताही धोका नसल्याचे दिसून आल्यानंतर आयसीसीने बांगलादेशाची मागणी नाकारली होती. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आयसीसीने स्कॉटलंडबरोबर संवाद सुरू ठेवला होता. बांगलादेशाने नकार दिल्यानंतर स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. (Bangladesh out, Scotland in)

आयपीएल कोलकोता नाईट रायडर्सने बांगलदेशाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला सोडल्यानंतर दोन्ही देशांच्या बोर्डामधील तणाव वाढला होता. रहमानला वगळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट असोसिएशनने आक्षेप घेतला होता. या स्पर्धेत स्कॉटलंडचे तीन सामने कोलकोता येथील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडचे सामने कोलकोता येथे होणार आहेत.  एक सामना मुंबईत १७ फेब्रुवारी होणार आहे.  (Bangladesh out, Scotland in)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर