जमीर काझी : मुंबई : हिंदू म्हणून लोकांना मतदान करायला लावणारे बाळासाहेब हे पहिले व्यक्ती होते, पण आज जो हिंदुत्वाचा बाजार सुरू आहे तो पाहिला असता तर बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या, अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शुक्रवारपासून सुरवात झाली. त्यानिमित्त वांद्रे येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेकडून आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यकर्माच्या निमित्याने महापालिका निवडणूक निकालानंतर उद्धव व राज हे प्रथमच जाहीर कार्यक्रमात एकत्र आले. (commercialization of Hindutva)
राज यांनी सोशल मीडियावरून बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहताना मराठी माणसाच्या भल्यासाठी बाळासाहेबाच्या शिकवणीप्रमाणे लवचिक भूमिका घेतल्याचे म्हटले होते. त्यामागे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला मनसेने दिलेल्या पाठिंब्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. दिवसभर हा चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे प्रत्यक्ष भाषणात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा देत सद्याच्या राजकीय परिस्थितीबाबत खेद व्यक्त करताना भाजपाच्या कार्यपद्धतीवर थेटपणे उल्लेख न करता कडाडून हल्ला चढविला.
ते म्हणाले,’ देशात आणि महाराष्ट्रात सध्या गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत. मुंबईसह कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून अक्षरशः शिसारी आली. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटते की बाळासाहेब नाहीत ते बरे झाले. हे सगळं चित्र पाहून बाळासाहेब किती व्यथित झाले असते? सामनामध्ये मी एक लेखही लिहिला आहे. बाळासाहेबांना कसं पाहायचे, त्यांना कसं मांडायचं हा प्रश्न अनेकदा उभे राहतो. हिंदुहृदयसम्राट, व्यंगचित्रकार, राजकारणी असे अनेक पैलू आहेत. बाहेर अनेक काही घडायचं, पण बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटताना त्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर उमटत नसायचा.” (commercialization of Hindutva)
‘ मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी पक्ष सोडणं हे नव्हते तर ते घर सोडणे होते. त्यानंतर मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या. २० वर्षात जे काही झालं गेले ते आता सोडून द्या एकदा.” असे सांगून ते म्हणाले, ‘मला एकदा बाळासाहेब ठाकरे या विषयावर व्याख्यान द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू मला मांडायला आवडेल. हत्तीच्या गोष्टीप्रमाणे बाळासाहेब प्रत्येकाला वेगवेगळे वाटतात, पण जगाला ते कळलेच नाही ‘
यावेळी त्यांनी बाळासाहेब आणि प्रमोद महजानांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेन असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यावर प्रमोद महाजन यांनी ते शक्य नसल्याचं सांगितले. त्यावर ‘मी तसे करायला लावेन’ असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले. आज जे हिंदुत्वाच्या नावाने आरडाओरडा करतात त्यांना त्यावेळी ही कल्पनाही नव्हती. आज त्याच लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडला आहे जर बाळासाहेब हयात असते तर त्यांना ते सहन झाले, असे त्यांनी भावपूर्ण होत सांगितले.यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत व अमित ठाकरेही उपस्थित होते. (commercialization of Hindutva)