पुणे : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा छात्रो को गुंज हा कार्यक्रम आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे. या कार्यक्रमाची काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत असताना शुक्रवारी मध्यरात्री सीओईपी तंत्रज्ञान विदयापीठ परिसरात भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय कार्यकर्त्यामध्ये जोरदार झडप उडाली. दोन्ही संघटनातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना उतरावे लागले. दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे. अभाविपच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कार्यक्रमांवरुन काँग्रेस आणि भाजप नेत्यामध्ये परस्परावर टीकास्त्र सुरू झाले आहे. (ABVP and NSUI activists clashed in Pune)
राहूल गांधी एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. पोलिसांनी ३० अटीसह परवानगी मागितली. सीओईपीमधील काही विद्यार्थींनीनी माध्यमांशी बेलताना कार्यक्रमासह शैक्षणिक शुल्क आणि आर्थिक अडचणीचे प्रश्न मांडले होते. पण कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच अभाविप आणि एनएसयूआय कार्यकर्त्यामध्ये वाद झाला. (ABVP and NSUI activists clashed in Pune)
अभाविपचे प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी यांनी असा आरोप केला की एनएसयुआयचे दीडशे कार्यकत्यांनी वसतीगृहात घुसून विद्यार्थींनीना कार्यक्रमाला येण्यासाठी धमकावले होते. तसेच काही विद्यार्थींनीना मारहाण झालाचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे विद्यार्थींनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी दबाव आणला आणण्यात आला. त्याला विद्यार्थींनीनी विरोध केल्यावर अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना वसतीगृहात डांबून ठेवल्याचा आरोप एनसएसयुआयने केला. या घटनेची माहिती मिळताच एनएसयुआय आणि अभाविपचे कार्यकर्ते परिसरात पोहोचल्याने तणाव निर्माण झाला. दोन्ही कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धाऊन गेले. धक्काबुक्कीही झाले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पांगवले. (ABVP and NSUI activists clashed in Pune)