12 civilians killed: पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा; बारा नागरीक ठार

7 civilians killed

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात १२ नागरिकांचा मृत्यू झाला. यात जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात, नियंत्रण रेषेवर (एलओसी) जोरदार गोळीबार केला. यामध्ये चार मुलांसह किमान १२ जण ठार झाले. ५७ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूंछ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. मृतांमधील बहुतांश नागरिक येथील आहे. जखमींपैकी ४२ जण एकट्या पूंछमधील होते, तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये शत्रूच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या. मोठ्या प्रमाणात पाकिस्तानची जीवितहानी झाली, असे अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.

हेही वाचा
पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
आम्हाला सैन्यदलाचा गर्व आहे

Related posts

अबब राज्याची ३० हजार कोटी महसूली तुट! ;कॅगकडून सरकारवर कडक ताशेरे 

वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी : हर्षवर्धन सपकाळ

केंद्राला वांगचुकचा बळी हवा आहे; राज ठाकरेंची भाजपावर टीका