India’s Operation Sindoor: पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

India’s Operation Sindoor

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे १२-१८ किमी अंतरावर आत असलेल्या सियालकोटमधील मेहमूना जोया तळासह नऊ तळ उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.(India’s Operation Sindoor)

विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी कारवाईत त्यांचा सहभाग होता, याची खात्री झाल्यानेच ते अड्डे भारतीय लष्कराने लक्ष्य केले. (India’s Operation Sindoor)

‘‘पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते नष्ट करण्यात आले,’’ असेही कर्नल कुरेशी म्हणाल्या.

‘‘गेल्या तीन दशकांमध्ये, पाकिस्तानने पद्धतशीरपणे दहशतवाद्यांचे जाळे पसरवले आहे. या केंद्रांवर भरती आणि प्रशिक्षण देण्यात येत असे. तसेच प्रारंभिक आणि रीफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षण क्षेत्रे आणि हँडलर्ससाठी लाँचपॅडचे एक जटिल जाळे उभारण्यात आले आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांना पाकिस्तानचा थेट पाठिंबा

भारतविरोधी दहशतवादी पायाभूत सुविधांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी लक्ष्यांची काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती. ही ठिकाणे लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिदीन (एचएम) यांसारख्या प्रतिबंधित गटांशी संबंधित होती. या संघटनांना पाकिस्तानच्या लष्कर आणि गुप्तचर संस्थांकडून थेट पाठिंबा आणि आश्रय मिळतो. (India’s Operation Sindoor)

हे गट प्रशिक्षण शिबिरे (मरकझ) आणि लाँच पॅडमधून काम करतात. त्यापैकी बरेच सरकारी इमारती आणि संस्थांमध्ये लपलेले असतात. लाँच पॅड घुसखोरीचे प्रयत्न आणि शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जातात. तर पाकिस्तानमधील मोठ्या सुविधा धार्मिक शिकवण, प्रचार, रसद आणि भरतीसाठी वापरल्या जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही आमचा अधिकार वापरला

‘दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याचा अधिकार आम्ही वापरला,’ असे भारताचे म्हणणे आहे.

भारताकडून कोणत्याही लष्करी लक्ष्यांवर हल्ला झालेला नाही. लक्ष्यित नऊ ठिकाणे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आणि सीमापार दहशतवादात त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानेच ती निवडण्यात आली, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.

‘हिजबुल’ सर्वांत मोठ्या तळांपैकी एकावर हल्ला

कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांना संबोधित करताना पाकिस्तानच्या आत १२-१८ किमी अंतरावर असलेल्या सियालकोटमधील मेहमूना जोया तळासह नष्ट झालेल्या दहशतवादी तळांचे व्हिडिओ सादर केले. (India’s Operation Sindoor)

हिजबुल मुजाहिदीनच्या तळांपैकी हा सर्वांत मोठा तळ आहे. जम्मू प्रदेशातील कठुआमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी एक प्रमुख नियंत्रण केंद्र म्हणून हा तळ काम करतो. पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्याचे नियोजन आणि निर्देश करण्यात या तळाचा सहभाग होता.

मुरीदके येथील मरकझ तैयबा

कर्नल सोफिया कुरेशी यांनी मुरीदकेसह नष्ट झालेल्या दहशतवादी छावण्यांचे व्हिडिओ सादर केले. येथे २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली या दोघांना प्रशिक्षण देण्यात आले होते.

सियालकोटमधील सरजल कॅम्प

पाकिस्तानच्या आत ६ किमी अंतरावर असलेल्या सियालकोटमधील सरजलसह नष्ट झालेल्या दहशतवादी छावण्यांचे व्हिडिओ कर्नल सोफिया कुरेशी यांनी सादर केले. या छावणीत जम्मू-काश्मीरच्या चार पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

भारतीय सशस्त्र दलांनी जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या बहावलपूर, पाकिस्तानमधील मरकज सुभान अल्लाह येथील दहशतवादी तळही उद्ध्वस्त केले.
भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केलेले दहशतवादी तळ

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर