नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादयांचे अड्डे उद्धवस्त केल्यानंतर भारतीय सैन्यदलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करताना ‘आम्हाला आमच्या सशस्त्र दलाचा गर्व आहे. जय हिंद’ अशा शब्दात ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आहे. (Leaders Reaction)
मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून सैन्याचे कौतुक
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आम्हाला आमच्या भारतीय सशस्त्र दलाचा खूप गर्व आहे. ज्यांनी पाकिस्तान आणि पीओके मधील अतिरेकी तळ उद्धवस्त केले. खर्गे म्हणाले, “सशस्त्र दलाचा दृढ संकल्प आणि धाडसाचे कौतुक आहे. भारतची पाकिस्तान आणि पीओके मधून सुरू असलेल्या आंतकवाद कारवायाची निती पाकिस्तान कधीच बदलणार नाही. पण भारतीय सैन्याचा आम्हाला गर्व आहे. त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील अतिरेकी तळ उद्धवस्त केले. त्यांच्या धैय आणि आत्मविश्वासाचे आम्हाला कौतुक आहे. पहलगामवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सीमेपलिकडून होणाऱ्या आंतकवादी कारवायाच्या विरोधात कठोर पावले उचवण्यासाठी आमचाकडून सरकारला साथ दिली जाईल”. (Leaders Reaction)
सशस्त्र दलाचा अभिमान, गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याचा योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे ”. (Leaders Reaction)
‘भारत माता की जय’ सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह
. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ‘भारत माता की जय’ अशा शब्दात भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाबाबत जगाने झिरो टॉलरन्स नीती दाखवली पाहिजे. त्यांनी ही एकच लाईन ट्वीट करत जगानेही दहशतवादाला थारा न देता, अशीच नीती राबावायला हवे अस म्हटले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अदित्यनाथ यांनी ‘जय हिंद, जय हिंद की की सेना’ अशी पोस्ट केली आहे. (Leaders Reaction)
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी सरंक्षण मंत्री, खासदार शरद पवार यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले आहे. एक्सवर पोस्ट करत असे म्हटले आहे की, “भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!” (Leaders Reaction)
पाकिस्तानचा आतंकी पाया नष्ट झाला पाहिजे, असदुद्दीन ओवेसी
एमआईएमआईएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमधील आतंकवादी अड्डे भारतीय सैन्याने उद्धवस्त केल्यावर भारतीय सैन्याचे अभिनंदन करतो. पाकिस्तानला ही ताकीद आहे की यापुढे दुसरा पहेलगाम होता कामा नये. पाकिस्तानचा आंतकी पाया समूळ नष्ट झाला पाहिजे. (Leaders Reaction)