Woman dies in road accident : दुचाकीवरुन छत्री उघडताना रस्त्यावर पडल्याने महिलेचा मृत्यू

Woman dies in road accident

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुलासमवेत दुचाकीवर मागे बसलेल्या माहिलेचा रस्त्यांवर पडून मृत्यू झाला. पाऊस आल्याने छत्री उघडल्यानंतर ती उलटी झाल्याने तोल जाऊन चालत्या दुचाकीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिना दिलीपराव मगदुम (वय ५८ रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर) असे मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू अशी नोंद झाली आहे. (Woman dies in road accident)

पोलिसांनी आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार,  मीना मगदूम या महापालिकेतील आस्थापना विभागात शिपाई पदावर नोकरीस होत्या. मंगळवारी सकाळी मुलगा अक्षय त्यांना दुचाकीवरुन महापालिकेमध्ये नोकरीवर सोडण्यास निघाला होता. महाद्वार रोडवर आल्यावर पाऊस आल्याने मीना मगदूम यांनी छत्री उघडली. मात्र वाऱ्यामुळे छत्री उलटी झाली. यामुळे मगदूम यांचा दुचाकीवरुन तोल गेला व त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व नाकातून रक्तस्त्राव होवू लागला. मुलगा अक्षय याने आईला तात्काळ रिक्षातून सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेले.  मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, ‘एक मुलगी असा परिवार आहे. (Woman dies in road accident)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर