High court grants bail : संसदेच्या आवारात रंगाचा धूर उडवणाऱ्या दोघांना जामीन मंजूर

High court grants bail

नवी दिल्ली : संसदेच्या आवारात २०२३ मध्ये ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत रंगाचे धूर उडवणाऱ्या दोन आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण त्यांना मुलाखती देण्यास मनाई करण्यात आली. २०२३ मध्ये दोन आरोपींनी संसदेचे कामकाज सुरू असताना गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या होत्या. तर दोन आरोपींनी संसदेच्या आवारात घोषणाबाजी करुन रंगाचा धूर उडवला होता. नीलम आझाद आणि महेश कुमावत अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. १३ डिसेंबर २०२३ रोजी ही घटना घडली होती. (High court grants bail)

न्यायमूर्ती सब्रमोनियम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथ शंकर यांच्या खंडपीठाने २१ मे रोजी राखीव ठेवलेला निर्णय आज देण्यात आला. न्यायालयाने प्रत्येकी दोघांना ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने दोघांनाही पत्रकार परिषद आणि मुलाखत देण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेशी संबधित सोशल मिडियावर काहीही पोस्ट करण्यास खंडपीठाने मनाई केली. तसेच आठवड्यातील तीन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे आदेश दिले. दोघांनाही दिल्ली सोडू नये असे आदेश दिले आहे. (High court grants bail)

सुनावणीच्यावेळी खंडपीठाने दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारला होती की आरोपीविरुद्ध कठोर युएपीए अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला आहे का? जर धुराच्या डब्याचा वापर करणे दहशतवादी कृत असेल तर प्रत्येक होळी आणि आयपीएल सामना देखील यूएपीए अंतर्गत गुन्हा ठरेल, अशी तोंडी टिप्पणी केली आहे. तसेच त्यानंतर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना असे स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते की, प्राणघातक नसलेले धुराचे डबे बाळगणे किंवा वापरणे हे युएपीए अंतर्गत दहशतवादी कृत्याच्या गुन्ह्यासाठी समाविष्ट आहे का? असा प्रश्नही विचारला आहे.

१३ डिसेंबर २०२३ रोजी शून्य तास सुरू असताना सार्वजनिक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी उड्या मारल्या होत्या. . सोशल मीडियावर आलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये, दोघांनी पिवळा वायू सोडणारे डबे धरलेले दिसत होते. ते घोषणाबाजी देखील करत होते. या दोघांना काही खासदारांनी वेढले होते. अमोल शिंदे आणि नीलम आझाद अशी ओळख पटवणाऱ्या इतर दोन आरोपींनीही संसदेच्या बाहेर अशाच प्रकारच्या डब्यांमधून रंगीत गॅस फवारला. ते “तानाशाही नाही चलेगी” असे ओरडत होते. (High court grants bail)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर