नागपूर : एखाद्या मुलीला निर्हेतूकपणे ‘आय लव्ह यू’ असे म्हणणे लैंगिक छळाचा गुन्हा ठरत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दिला. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी हा निर्णय देताना ‘लैंगिक हेतू’ने किंवा तशी कृती करण्याचा हेतू न ठेवता ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ ठरत नाही, असे म्हटले आहे. (Sexual Harasment)
या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीला शिकवणी वर्गातून घरी जात असताना ‘आय लव्ह यू’ म्हणत तिचे नाव विचारले होते.
‘‘आरोपीने उच्चारलेल्या शब्दांमागे ‘लैंगिक हेतू’ असला पाहिजे. लैंगिक संबंध किंवा शारीरिक संबंध ठेवण्याचा किंवा लैंगिक इच्छा व्यक्त करण्याचा हेतू त्यामध्ये असला पाहिजे तर तो लैंगिक छळ ठरू शकेल. स्वतःच कायदेमंडळाने विचारात घेतल्याप्रमाणे ‘आय लव्ह यू’ उच्चारलेले शब्द ‘लैंगिक हेतू’ म्हणून मानले जाणार नाहीत. जर उच्चारलेले शब्द लैंगिक हेतू व्यक्त करणारे मानले गेले तर ते कृतीतून प्रतिबिंबित झाले पाहिजे,’’ असे न्यायमूर्ती जोशी-फाळके यांनी आदेशात म्हटले आहे. (Sexual Harasment)
सरकारी खटल्यानुसार, पीडितेच्या कुटुंबाने २३ ऑक्टोबर २०१५ रोजी अपीलकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. संबंधिताने त्यांच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यात केला होता. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपी त्याच्या मोटारसायकलवरून आला होता जेव्हा पीडिता ११वीत शिकत होती आणि घरी परतत होती. त्याने रस्त्यात तिला गाठले आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हणत तिला तुझे नाव काय आहे, ते एकदा सांग असे म्हटले होते.
या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने तिच्या पालकांना या कृत्याबद्दल सांगितले आणि त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. (Sexual Harasment)
तथापि, न्यायमूर्ती जोशी-फाळके यांनी नमूद केले की, ‘लैंगिक हेतूने’, ‘आय लव्ह यू’ हे शब्द आरोपीने उच्चारले होते असे सरकारी वकिलांच्या साक्षीवरून कुठेही दिसून येत नाही.
‘लैंगिक हेतू’ हा शब्दप्रयोग वस्तुस्थितीदर्शक आहे. तो पुराव्याच्या आधारे निश्चित केला पाहिजे. अशा उच्चारांमागील आरोपीचा हेतू समजून घेण्यासाठी, फिर्यादी पक्षाच्या संपूर्ण पुराव्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे न्यायाधीश म्हणाले. (Sexual Harasment) या निरीक्षणांसह, खंडपीठाने नागपूरमधील सत्र न्यायालयाचा १८ ऑगस्ट २०१७ चा निकाल रद्दबातल ठरवला. अपीलकर्त्याला सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि ५,००० रुपये दंड ठोठावला होता.
हेही वाचा :
सहा दशके घरात काँग्रेस… तरीही भाजपमध्ये प्रवेश
विद्यार्थीनीची छेड काढल्याने शिक्षकाला बेदम चोप
बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ : मुख्यमंत्री