प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण का?; इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस

Why is the investigation against Prashant Koratkar incomplete

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन एक वर्ष होईल पण अजूनही या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही? असा प्रश्न विचारणारी कायदेशीर नोटीस इतिहास तज्ज्ञ  इंद्रजित सावंत यांनी  ॲड.असीम सरोदे, ॲड श्रीया आवले, ॲड योगेश सावंत, ॲड. हेमा काटकर आणि ॲड. सकलेन मुजावर यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना पाठविली आहे. (Why is the investigation against Prashant Koratkar incomplete)

इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून त्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, मुख्यमंत्री ब्राम्हण आहे- आमचा आहे अशी तंबी भरणे आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील, त्यांचे चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याबद्दल एक मार्च २०२५ रोजी नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात  इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी प्रशांत कोरटकर आणि त्याला वाचविण्यासाठी सरकारमधील एक लॉबी व कट्टरवादी विचारधारा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती. पण एक वर्ष होईल तरी अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल झाली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवून विचारणा केली आहे, अशी माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली. (Why is the investigation against Prashant Koratkar incomplete)

न्यायालयाने जामीन देतांना आरोप प्रशांत कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्यांचे पालन होतेय का?, प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रात आहे कि दुबईत पळून गेला आहे? असे प्रश्न सुद्धा इंद्रजित सावंत यांनी नोटीस मधून उपस्थित केले आहेत. पोलीस जर प्रामाणिक व पारदर्शक  भूमिकेतून तपास करण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी पाळत नसतील तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असे इंद्रजित सावंत म्हणाले. (Why is the investigation against Prashant Koratkar incomplete)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर