भाजपच्या ट्रोलर्सला सोडणार नाही; रोहित पवारांचा इशारा

Will not spare BJP trolls

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून हा घातपात आहे, असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवार यांना भाजपच्या ट्रोलर्सनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. या ट्रोलर्सना सोडणार नाही अशा इशारा त्यांनी दिला.  (Will not spare BJP trolls)

भाजप पक्षाचे ट्रोलर्स

भाजपचा ट्रोलर समीत ठक्कर यांचा उल्लेख करत आमदार पवारांनी इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी आज मुंबईत अजित पवारांच्या अपघातासंबधी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या ट्रोलर्सचे चॅटस् दाखवले. ते म्हणाले, मी एकदा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला होता. दिल्लीतील पत्रकार परिषदेत सुद्धा याबाबत मी माहिती देताना सांगितले होते की मी आणि एक भारतीय खेळाडू या विमानातून बारामतीला गेले होते, तिथून पुढे मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो. पण समीत ठक्कर नावाच्या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी “तू स्वतः प्रवास करत असताना तुला काही कळले नाही का?” अशी पोस्ट केली आहे. पण मला थोडी हे कळणार होते की या महाशयाची अपेक्षा होती की त्यावेळी माझा अपघात त्या ठिकाणी व्हायला हवा होता आणि तेव्हा मी आणि क्रिकेटर तेव्हा संपायला हवे होते. अशी या व्यक्तीची अपेक्षा होती का? असे पैसे घेऊन काम करणारे ट्रोलर्स कोणाचे आहेत? याचा मी अभ्यास केला तेव्हा कळले की हे फार मोठ्या भाजप पक्षाचे आहेत, असे यावेळी रोहित पवारांनी सांगितले. (Will not spare BJP trolls)

घातपाताचा मुददा मांडायला लागल्यावर ट्रोल करायला लागलेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोलर्सबाबत माहिती नसावी, असे मला वाटत आहे. मी अजितदादांच्या घातपाताचा मुद्दा मांडत आहे. पण मला भाजपचे ट्रोलर्स का ट्रोल करायला लागले आहेत? समीत ठक्कर हा काही छोटा ट्रोलर नाही तर हा मोठा ट्रोलर आहे. कारण, त्याने एखादे ट्वीट किंवा एखादा मेसेज टाकला की याचे बगलबच्चे पैसे घेऊन काम करतात आणि तेच रिट्वीट करतात. त्याशिवाय, याच समीत ठक्करने अजित दादांच्या अपघाताच्या दोन दिवस आधी एक ट्वीट केले आणि ते साडेसात मिनिटानंतर डिलीट केले. त्याने त्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, पुढच्या दोन दिवसात एक अशी घटना घडणार आहे की त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा भूकंप येऊ शकतो. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

समित ठक्कर भाजपला ट्रोलर

समित ठक्कर आहे कोण? त्यासोबत जे इतर कोणी आहे ट्रोल करणारे. हे सर्व भाजपचे ट्रोलर्स आहेत. कारण, ते त्यांचे पेजेस काढतात आणि पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत सर्व. यामुळे आता लोकांना वेगळी शंका येऊ लागली आहे. मी भावनेच्या भरात मुद्दे मांडत आहे. अराजकीय मुद्दे मांडत आहे. पण भाजप मला ट्रोल करत आहे. परंतु, मला ट्रोल करण्याचे कारण काय? असा प्रश्न आता लोकांना पडायला लागला आहे. पण हा ठक्कर आहे, त्याला आम्ही सोडणार नाही. त्याची माहिती काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराच रोहित पवारांनी दिला आहे. (Will not spare BJP trolls)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर