West Indies team : वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

West Indies

किंग्जस्टन : या महिन्याअखेरीस आयर्लँड व इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वन-डे क्रिकेट मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. विंडीजचा संघ आयर्लँड आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी तीन वन-डे खेळणार आहे. (West Indies team)

शाय होपच्या नेतृत्वाखालील विंडीजच्या संघाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्धची वन-डे मालिका ३-० अशी एकतर्फी जिंकली होती. त्या संघामध्ये आता केवळ एक बदल करण्यात आला आहे. सध्या आयपीएलमध्ये खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज शिम्रॉन हेटमाएरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून त्याच्याजागी ज्वेल अँड्रयूला संघात स्थान देण्यात आले. हेटमाएर सध्या राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो आहे. अँड्रयू आतापर्यंत केवळ एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. (West Indies team)

वेस्ट इंडिजचा संघ प्रथम आयर्लँडच्या दौऱ्यावर जाणार आहे. २१ मे, २३ मे आणि २५ मे रोजी दोन्ही संघांदरम्यान वन-डे सामने रंगतील. त्यानंतर, विंडीजचा संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. विंडीज-इंग्लंड यांच्यामध्ये २९ मे, १ जून आणि ३ जून रोजी वन-डे सामने खेळवण्यात येणार आहेत. ही वन-डे मालिका संपल्यानंतर या दोन देशांमध्ये ६ ते १० जूनदरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिकाही रंगणार आहे. त्यानंतर, १२ ते १५ जून दरम्यान विंडीज-आयर्लंड यांच्यामध्येही तीन सामन्यांची टी-२० मालिका होईल. या दोन्ही टी-२० मालिकांसाठी विंडीजचा संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. (West Indies team)

वेस्ट इंडिज वन-डे संघ : शाय होप (कर्णधार), जेव्हेल अँड्रयू, केसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रिव्ह्ज, आमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, एव्हिन लुईस, गुडाकेश मोती, शर्फेन रुदरफोर्ड, जेडन सिल्स, रोमारिओ शेफर्ड.

हेही वाचा :
रबाडाला खेळण्यास परवानगी

Related posts

आसाममधील ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन

इंडिया टुडे समूहाने घेतले १२० कर्मचाऱ्यांचे राजीनामे

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा