Judges’s assets:  सरन्यायाधीशांकडे ५५ लाखाच्या ठेवी, दोन फ्लॅट

Judges’s assets

नवी दिल्ली : सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपल्या मालमत्ता जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर सोमवारी (६ मे) रात्री मालमत्ता आणि रोख रकमेचा तपशील अपलोड करण्यात आला आहे. (Judges’s assets)

त्यानुसार, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे ५५.७५ लाख रुपये मुदत ठेवी आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये १.०६ कोटी रुपये आहेत. तर १४ मे रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणारे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या बँक खात्यांमध्ये १९.६३ लाख रुपये आणि पीपीएफ खात्यात ६.५९ लाख रुपये आहेत.(Judges’s assets)

१ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बैठक झाली होती. या बैठकीत त्यांची मालमत्ता जाहीर करण्याचा आणि ती न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही माहिती अपलोड करण्यात आली आहे. वेबसाइटवर ३३ न्यायाधीशांपैकी २१ न्यायाधीशांच्या मालमत्तेची यादी देण्यात आली. घोषित केलेल्या तपशीलांमध्ये वैयक्तिक मालमत्तांच्या तपशीलांव्यतिरिक्त, त्यांच्या पत्नी आणि अवलंबितांच्या मालमत्तांचाही समावेश आहे.

  • सरन्यायाधीश खन्ना

सीजेआय खन्ना यांचा दक्षिण दिल्लीत दोन बेडरूमचा डीडीए फ्लॅट आणि कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये चार बेडरूमचा फ्लॅट आहे. गुरुग्राममधील या चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये त्यांचा ५६ टक्के आणि त्यांच्या मुलीकडे उर्वरित ४४ टक्के वाटा आहे. शिवाय फाळणीपूर्वीच्या हिमाचल प्रदेशातील वडिलोपार्जित घराचा वाटाही आहे.(Judges’s assets)

  • न्यायमूर्ती भूषण गवई

न्या. गवई यांना महाराष्ट्रातील अमरावती येथे एक घर वारसाहक्काने मिळाले आहे. तसेच मुंबई आणि दिल्लीतील निवासी अपार्टमेंटही आहेत. त्यांना अमरावती आणि नागपूर येथे शेतजमीनही वारशाने मिळाली आहे. त्यांनी १.३ कोटी रुपयांचे दायित्व देखील घोषित केले आहे.

हेही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत जाहीर करा
आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवा


Related posts

मान्सून हाच भारताचा खराखुरा अर्थमंत्री

एल निनोचा धोका; १५० ते २०० जिल्हे दुष्काळाच्या छायेत?

राहुल गांधींचं ऐतिहासिक भाषण, जे वाचायलाच हवं..