NEET scandal : ‘नीट’साठी २ ते ५ लाखांचा दर

NEET scandal

पाटणा : बिहारमध्ये नीट परीक्षेचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तोतया उमेदवार बसवून पेपर देण्याचे रॅकेट चालवत असल्याची कबुली दिली आहे. त्यासाठी संबंधित तोतया उमेदवाराला दोन ते पाच लाख रुपये दिले जात होते, अशी माहिती उघड झाली आहे. (NEET scandal)

धक्कादायक म्हणजे यातील एकजण बेगुसराय जिल्हा कारागृहातील एक डॉक्टर आहे. त्याच्यासह दोघांना सोमवारी समस्तीपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

रविवारी (३ मे) रोजी देशात नीट परीक्षा आयोजित केली होती. या दरम्यान समस्तीपूरमध्ये एक कार फिरत आहे. त्यात या परीक्षा प्रक्रियेत ढवळाढवळ करणारी टोळी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. या पथकाने एका नीट परीक्षा केंद्रांजवळून दरभंगा नोंदणी क्रमांक असलेले एक वाहन शोधून काढले, असे समस्तीपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) संजय कुमार पांडे यांनी सांगितले. (NEET scandal)

‘‘मोहनपूर पुलाजवळ ही गाडी अडवण्यात आली. चौकशी केल्यानंतर, त्यामधील दोघांनी स्वतःची ओळख दरभंगा येथील रहिवासी रामबाबू मल्लिक आणि बेगुसराय तुरुंगात तैनात असलेले समस्तीपूर येथील रहिवासी डॉ. रणजित कुमार अशी करून दिली,’’ असे एएसपी पांडे यांनी सांगितले.

या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. चौकशीदरम्यान दोघांनीही नीट २०२५ च्या उमेदवारांची बनावट ओळखपत्रे तयार करण्याचे रॅकेट चालवल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून कारवाईत वापरलेली कार, रोख ५०,००० रुपये आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

यातील मलिक हा दरभंगा येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या कारवायांत गुंतल्याची माहिती मिळाली. तो याच ‘उद्योगा’त असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची सखोल माहिती त्याला होती. त्यातून तो हे बेकायदा रॅकेट चालवू लागला, अशी माहिती पुढे आल्याचे एएसपी पांडे यांनी सांगितले. (NEET scandal)

खऱ्या उमेदवारांच्या जागी परीक्षा देण्यासाठी प्रॉक्सी उमेदवार बसवणे, त्याबदल्यात मूळ उमेदवाराकडून या टोळीने मोठ्या पैसे उकळले आहेत. प्रत्येक परीक्षेसाठी प्रॉक्सी उमेदवारांना २ लाख ते ५ लाख रुपये दिले, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, आरोपींनी “NEET UG साठी अर्ज प्रक्रिया सुरू होताच बनावट ओळखपत्रे, स्वाक्षऱ्या, प्रवेशपत्रे आणि बनावट आधार कार्ड बनवल्याचे कबूल केले.

त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटा तपासला असता महत्त्वाचे पुरावे सापडल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.

रॅकेटमधील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशीदरम्यान मिळालेली माहिती आणि सापडलेले पुरावे याची छाननी सुरू आहे. त्यानंतरच या परीक्षेसाठी त्यांनी किती तोतया उमेदवार बसवले आहेत. याची माहिती मिळेल.

-संजय कुमार पांडे, एएसपी

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार