नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी (२५ एप्रिल) वक्फ सुधारणा कायद्याचे समर्थन करताना आपली बाजू मांडली. वक्फ सुधारणा कायदा विद्यमान स्थापित पद्धतींशी सुसंगत आहे. कायदेशीर अधिकाराचा तो वैध वापर आहे. हा कायदा वैध आणि कायदेशीर आहे, असे सरकारने म्हटले आहे. (Waqf hearing in SC)
वक्फ कायद्यातील सुधारणा मूलभूत धार्मिक स्वातंत्र्यांचे उल्लंघन करतात या चुकीच्या गृहीतकावर या कायद्याविरोधातील याचिका दाखल झाल्या आहेत, असा युक्तिवादही केंद्र सरकारने केला.
केंद्र सरकारने नुकताच वक्फ सुधारणा कायदा मंजूर केला आहे. या कायद्याविरोधात मोठ्या संख्येने याचिका सादर झाल्या आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एका आठवड्याच्या आत उत्तर द्यायला सांगितले होते. सरकारने ते शुक्रवारी सादर केले. याचिकाकर्त्यांना पाच दिवसांच्या आत त्यांचे उत्तर सादर करण्याची परवानगी दिली होती. (Waqf hearing in SC)
- केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या उत्तरातील महत्त्वाचे मुद्दे
- केंद्राने म्हटले आहे की, वक्फ सुधारणा कायदा हा अधिकाराचा वैध आणि कायदेशीर वापर आहे.
- प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की संसदेने बनवलेल्या कायद्यांना संवैधानिकतेचा आधार लागू होतो.
- वक्फ परिषद आणि औकाफ बोर्डमधील २२ सदस्यांमध्ये जास्तीत जास्त दोन गैर-मुस्लिम असतील. समावेशकतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही तरतूद आहे. त्याआधारे वक्फच्या प्रशासनात हस्तक्षेप करत नाही. (Waqf hearing in SC)
- वक्फसारख्या धार्मिक देणग्यांचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी संसदेने तिच्या कार्यक्षेत्रात काम केले आणि त्यावर विश्वास ठेवला.
- कायद्याच्या वैधतेचा अंदाज घेतल्यास प्रतिकूल परिणामांची जाणीव न ठेवता अनेक तरतुदींवर सरसकट स्थगिती देणे अयोग्य आहे.
- कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिका धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार हिरावून घेतात या खोट्या गृहितकांवर आधारीत आहेत.
- न्यायालयीन पुनरावलोकनाच्या मूलभूत तत्त्वांविरुद्ध वक्फ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांचे प्रयत्न आहेत, असे केंद्राने पुढे म्हटले आहे.
- खाजगी, सरकारी मालमत्तांवर अतिक्रमण करण्यासाठी तरतुदींचा गैरवापर झाला आहे.
- संयुक्त संसदीय समितीने केलेल्या व्यापक, सखोल, विश्लेषणात्मक अभ्यासानंतर कायद्यातील सुधारणा करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
हेही वाचा :
सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली
सावरकरांबद्दल अवमानास्पद टिप्पणी कराल तर…