पैशाची बंडल हाताळणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

Video of MLA Mahendra Dalvi goes viral

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांची बंडल घेऊन बसलेल्या एका आमदाराचा व्हिडिओ व्टिट केल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण गरम झाले आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माध्यमातून दानवे व्टिट केला आहे, असा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. तर दानवेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे आमदार कोण आहेत असा सवाल केला आहे.

पैशांच्या गड्ड्यासह आमदार काय करत आहेत?

दानवे यांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दानवे यांनी असे म्हटले आहे, सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत? पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी महायुती सरकारला केला आहे. (Video of MLA Mahendra Dalvi goes viral)

दानवेकडून पोलिस तपासाची मागणी

अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये सत्ताधारी आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. त्यासोबतच पैशांनी भरलेल्या थैल्या आहेत. नोटांची बंडलांचे ढिग दिसत आहेत. यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्येही पैशांनी भरलेल्या बॅगा दिसत होत्या. अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, पैशांचे बंडल घेऊन बसलेले हे आमदार कोण, त्यांना शोधावे लागेल. पोलिसांनी त्यांचा तपास केला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. (Video of MLA Mahendra Dalvi goes viral)

आमदार दळवींचे दानवेना चॅलेंज

महेंद्र दळवी यांनी खुलासा करताना म्हणाले, ज्यांनी व्हिडिओ व्टिट केला आहे, त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं. त्या व्हिडिओमध्ये लाल टी शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. घड्याळ दिसत आहे. अंबादास दानवे यांनी त्या व्हिडिओमधील व्यक्ती कोण आहे ते दाखवावं. आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांना चॅलेंज दिले आहे, ते चॅलेंज त्यांनी स्वीकारावे. रायगडचं चॅलेंज संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं, असं आव्हान मंत्री गोगावले यांनी दानवे यांना दिले आहे. (Video of MLA Mahendra Dalvi goes viral)

तटकरेकडून दानवेंना व्हिडिओ?

दानवे यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आला असल्याचा आरोप केला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, सुनील तटकरे यांच्यासोबत गेल्या वर्षभरात फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलणे झालेले नाही. माझ्यापर्यंत व्हिडिओ कोणी दिला याची चर्चा होण्यापेक्षा हा व्हिडिओ तुमचा आहे की नाही हे सांगा? असा सवाल दानवेंनी केला आहे. ज्या प्रमाणे व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी दिसत आहेत, त्याच प्रमाणे लाल टी-शर्टमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. ते अधिक दोषी असल्याचे मला वाटते. पोलिसांनी या व्हिडिओची चौकशी करावी, असेही दानवे म्हणाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर