दोन्ही सेनेच्या फोडाफोडीच्या चर्चेने नागपूरच्या थंडीत गरमी!

Both Shiv Sena's splits discussed

जमीर काझी : नागपूर :  ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था राज्यातील विरोधी पक्षाची झाली आहे. बोटावर मोजण्याइतपतच सदस्य आणि तेही विरोधी पक्ष नेत्यांविना, त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील विरोधकांची हवाच निघून गेली आहे.

गेल्या काही महिन्यात सत्ताधारी पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि मंत्र्यांशी संबंधित अनेक प्रकरणे, नगरपालिका निवडणुकीतील गोंधळ वादग्रस्त ठरली आहेत. त्यातील भ्रष्टाचाराबद्दल जर सभागृहात विरोधी नेत्यांकडून जर प्रश्न उपस्थित केला तर, तो  रेकॉर्डवर येईल,त्यामुळे दोन्ही सभागृहासाठी विरोधी नेताच द्यावायाचा नाही, असा डाव सत्ताधाऱ्यांनी रचला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ‘ना रहेगा बाज ना बजेगी बासरी’ या तत्वाने  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे दुसरे हिवाळी अधिवेशनाचे सोपास्कार बिनधास्तपणे पार पडेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. (Both Shiv Sena’s splits discussed)

हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिला दिवस नागरी समस्याऐवजी चर्चा रंगली ती ऑपरेशन टायगर आणि शिंदे सेनेच्या २२ आमदार फोडीची. महाविकास आघाडीत सर्वाधिक २० आमदार ठाकरेंचे असल्याने त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिले, त्याला दोन अधिवेशनाचा कालावधीत उलटून गेला तरी अध्यक्षाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याला शह देण्यासाठी या   जाधव यांच्याऐवजी   आदित्य ठाकरे  हे पद मिळविण्यासाठी इच्छुक आहेत, नाव घोषित केले जात नसल्याने महायुतीच्या नेत्यांनी भास्कर जाधव आणि ठाकरे गटाच्या काही आमदारांची भेट घेतली. परिवहन मंत्री सरनाईक  यांच्याशी चर्चा झाली. त्यातून  ‘ऑपरेशन टायगर’ची सुरु असल्याच्या ब्रेकिंग चालू लागल्याने अधिवेशनाला वेगळे वळण लागले.अखेर आदित्य ठाकरे यांनी त्यावर खुलासा करीत त्यावर पडदा टाकला. (Both Shiv Sena’s splits discussed)

 अदित्य ठाकरे यांनी  शिंदे गटातील २२ आमदारांचा गट भाजपात सामील होत असल्याचे विधान केले. शिंदे गटातील बंडाचे उद्योग एक मंत्री करत असल्याचे सांगितले. शिंदे गटाचे २२ आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा सुरु झाली. त्यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केल्यानंतर ती थंडावली.  

‘ आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे तो आमचा मित्र पक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार घेऊन काय करायचं आहे, आम्ही अशा प्रकारचं राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांनी त्यातील हवा काढली. (Both Shiv Sena’s splits discussed)

अधिवेशनाचा पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव सादर करून तहकूब    होत असते. मात्र त्याचदिवशी  अधिवेशन कसे चालणार?, हे स्पष्ट होत असते. त्यामुळे 7 दिवसाचे अधिवेशनाचे कामकाज पूर्णपणे सत्ताधाऱ्याच्या मनाप्रमाणे होईल, विरोधकांच्या हातात रोज थोडावेळ पायऱ्यावर बसून  निदर्शने करावीत आणि सभागृहाच्या कामकाजवर बहिष्कार टाकावा, इतकेच हाती उरले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर