Vaishnavi’s son’s Custody: वैष्णवीच्या मुलाचा सांभाळ तिच्या आईकडेच 

Vaishnavi’s son’s Custody

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी बाल कल्याण समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तिच्या मृत्यूमुळे तिच्या नऊ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवी हिची आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे मुलाचा ताबा कस्पटे कुटुंबीयांकडेच राहणार आहे. (Vaishnavi’s son’s Custody)

सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हिने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचे बाळ हगवणे कुटुंबाशी संबंधित निलेश चव्हाण याने ताब्यात घेतले होते. त्याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे पोलिसांच्या तपासातील दुर्लक्ष आणि  बाळाच्या हेळसांडीबद्दल राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवली. चव्हाण याने वैष्णवी हिच्या बाळाला एका अज्ञात ठिकाणी ठेवले होते. त्यानंतर त्याचा ताबा कस्पटे कुटुंबीयांकडे देण्यात आला होता. (Vaishnavi’s son’s Custody)
बालकल्याण समितीने आता त्याबाबत निर्णय घेतला आहे. जनक हगवणे याच्या सांभाळासाठी स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती असल्याचा अहवाल जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केला होता. अहवालानुसार स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे

हेही वाचा :
निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार राज्याला
भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर