Mumbai police Transfers: मुंबईतील तेरा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

Mumbai police Transfers

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या तेरा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये आयपीएस आणि महाराष्ट्र पोलिस सेवा अशा दोन्ही दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे विविध परिमंडळ आणि शाखांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Mumbai police Transfers)

त्यामध्ये कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ ३, तर दत्ता  नलावडे यांची परिमंडळ १० मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. महेश धर्माजी चिमटे यांची परिमंडळ १२, आणि समीर अस्लम शेख यांची परिमंडळ ६ मध्ये नियुक्ती झाली आहे. तसेच राकेश ओला यांच्याकडे परिमंडळ ७ ची जबाबदारी देण्यात आली आहे. (Mumbai police Transfers)

नवनाथ ढवळे यांची अंमली पदार्थ विरोधी पथक, विजयकांत  सागर यांची बंदर परिमंडळ, आणि प्रशांत  परदेशी यांची वाहतूक विभाग (दक्षिण) मध्ये बदली झाली आहे. निमित गोयल यांची विशेष कृती दल (आ.गु.वि) मध्ये तर दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखा १ मध्ये नियुक्ती झाली आहे.

पुरुषोत्तम  कऱ्हाड यांच्याकडे सायबर गुन्हे, सचिन  गुंजाळ यांच्याकडे प्रतिबंधक गुन्हे शाखा, आणि राज तिलक रोशन यांच्याकडे गुन्हे प्रकटीकरण विभाग देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  अधिकाऱ्यांच्या या बदल्या महत्वपूर्ण समजल्या जात आहेत.

हेही वाचा :
निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार राज्याला
वैष्णवीच्या मुलाचा सांभाळ तिच्या आईकडेच 

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला