डेहराडून : अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अंकिता पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर येथील वनयंत्र रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिची हत्या करण्यात आली होती. (Murder Case)
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी शिक्षा सुनावली.
रिसॉर्ट चालक पुलकित आर्य आणि त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी अंकिताची हत्या करून मृतदेह नाल्यात टाकला होता.(Murder Case)
अंकिताच्या हत्येचा विषय स्थानिक नागरिकांनी लावून धरला होता. आरोपींचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली होती. याची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होत.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर येथील वनयंत्र रिसॉर्टमध्ये अंकिता रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी अंकिता आणि भंडारी यांच्यात कशावरून तरीवाद झाला. तिची हत्या केली. ही घटना १८ सप्टेंबर २०२२ रोजी घडली होती. हत्या केल्यानंतर अंकिताचा मृतदेह तिघांनी ऋषिकेशमधील चिला कालव्यात फेकून दिला.
तपासाअंती कालव्यातून तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली.(Murder Case)
पुलकीत आर्य हा भाजपचे माजी नेते विनोद आर्य यांचे पुत्र आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच पक्षाने विनोद आर्य यांची हकालपट्टी केली होती. या प्रकरणाची सुनावणी दोन वर्षे आणि आठ महिने चालली आणि या काळात ४७ साक्षीदार तपासण्यात आले.
हेही वाचा :
भारत- अमेरिकन विद्यार्थीनीची इस्त्रायलच्या नरसंहारावर टीका
नीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या