नवी दिल्ली : संपूर्ण जग अडचणीत आलेल्या अमेरिका इराण युद्ध संपुष्टात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये १४ कलमी शांतता करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली. या घोषनेनंतर कच्च्या तेलाचे दर खाली आहेत आहेत. होमुर्झची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार असून इराणी बंदरावर लावलेली अमेरिका नौदलाची नाकेबंदी तातडीने हटवण्यात येणार आहे. एकूण १४ कलमी शांतता करार झाला आहे. १९ जून रोज स्विर्त्झलंडमध्ये या करारावर औपचारिक स्वाक्षरी होणार आहे. (US-Iran 14-point peace agreement)
होर्मुझ सामुद्रधुणी खुली होणार
इराणनच्या निम सरकार मेहर न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी कारवाया थांबवणे, इराणी तेल निर्यातील निर्बंध हटवणे, होर्मुझजी सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे, इराणसाठी किंमान ३०० अब्ज डॉलर्सच्या पुनर्रचना पॅकेजच्या तरतुदीचा १४ कलमी शांतता करारात समावेश आहे. (US-Iran 14-point peace agreement)
इराणच्या इंधन निर्यातवरील बंदी हटणार
इराणच्या पेट्रोकेमिकल्स आणि संबंधित निर्यातीवरील बंदी हटवण्यात आली आहे. १४ मुद्द्याच्या करारात इराणला आर्थिक संसाधनांचा पूर्ण वापर पुन्हा मिळणार आहे. ६० दिवसांच्या चर्चेदरम्यान ईराणे गोठवण्यात आलेले २४ अब्ज डॉलर देण्यात येतील. यातील १२ अब्ज डॉलर चर्चा सुरू होण्यापूर्वीच मिळतील. (US-Iran 14-point peace agreement)
इराणच्या पुनर्निर्माणासाठी ३०० अब्ज डालर्सच्या योजना
अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांनी इराणच्या पुनर्निर्माणासाठी सुमारे ३०० अब्ज डॉलर्सच्या योजना सादर कराव्यात, असा करारात उल्लेख आहे. लेबनॉनसह अन्य ठिकाणी होत असलेले हल्ले तातडीने आणि कायमचे थांबवले जाणार आहेत. अमेरिका इराणच्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांत हस्तक्षेप करणार नाही. इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर राखणार आहे. अमेरिकेने लादलेली नौदल नाकेबंदी ३० दिवसांत पूर्णपणे हटवली जाईल. अमेरिकी सैन्य ईराणच्या आसपासच्या परिसरातून मागे हटेल. होर्मुझची सामुद्रधुनी ईराणच्या नेतृत्त्वाखाली ३० दिवसांत पुन्हा सुरू केली जाईल. अण्वस्त्र मुद्द्यासाठी ६० दिवसांच्या चर्चेची प्रक्रिया सुरू केली जाईल. इराण अण्वस्त्र हत्यारे न बनवण्याच्या आपल्या वचनाचा पुनरावृत्ती करेल. अंतिम करार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाने मंजूर केला जाईल.