अमेरिका इराणची युद्धविरामाचा घोषणा; पाकिस्तानमध्ये दोन्ही देशात चर्चा होणार

US and Iran Announce Ceasefire

नवी दिल्ली : इराण बेचिराख करु, त्यांना पाषाणयुगात नेऊन अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाची घोषणा केल्याने जगाने तात्पुरता सुटकेचा निश्वास टाकला आहे. इराणनेही युद्धविरामाला मान्यता दिली आहे. चीन आणि पाकिस्तानने युद्ध थांबवण्याच्या प्रयत्न केल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. दरम्यान इराणने अमेरिकेसमोर दहा अटी ठेवल्या आहेत. शुक्रवारी (१०) अमेरिका आणि इराण या दोन्ही देशामध्ये पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबाद येथे चर्चा होणार आहे.

इराण आणि अमेरिका दोन आठवड्याच्या युद्धविरामांवर सहमत झाले आहेत. युद्धविरामाच्या घोषनेनंतर जागतिक कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्सच्या खाली आले आहेत. तसेच अशियाई आणि भारतीय शेअरबाजारात तेजी आली आहे. युद्ध विराम झाल्याबददल इराण आणि अमेरिकेने पाकिस्तानाचे आभार मानले आहेत. (US and Iran Announce Ceasefire)

अमेरिकेने इराणविरुद्धच्या सर्व आक्रमक लष्करी कारवाया स्थगित केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्याचे शस्त्रसंधीविषयक निवेदन जारी केले आहे. दोन आठवड्यात शस्त्रसंधी आणि होमुर्झची सामुद्रधुनी खुली झाल्याच्या घोषणेची माहिती दिली आहे. आपल्या निवेदनात अराघची यांनी म्हटले आहे की, जर इराणवरील हल्ले थांबले, तर त्यांचे सशस्त्र दलदेखील आपल्या बचावात्मक कारवाया थांबवतील. या सर्व घडामोडींवर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनीही अमेरिकेच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने १५-कलमी प्रस्ताव सादर केला होता, तर इराणने १०-कलमी आराखडा सादर केला होता. अमेरिका-इस्रायल आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. याचा अर्थ आता दोन्ही बाजूंनी होणारे हल्ले हे काहीकाळ थांबवले जातील. पण, हा फक्त युद्धविराम आहे ही युद्धसमाप्ती नव्हे. तब्बल ४० दिवस सुरु असलेल्या युद्धात परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली होती. हा युद्धविराम एक द्विपक्षीय करार असून दोन्ही बाजूंच्या संमतीने उचललेले एक पाऊल आहे. (US and Iran Announce Ceasefire)

इराणच्या १० अटी :

१ अमेरिकेने तातडीने हिंसा थांबवावी

२. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) इराणचे नियंत्रण कायम राहणार आहे

३. इराणला स्वतःच्या अणूप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धन करण्याची अधिकृत मान्यता मिळेल.

४.  अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध तात्काळ हटवले जातील.

५.  इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवर लादले जाणारे सर्व दुय्यम निर्बंधही रद्द केले जातील.

६. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) इराणविरुद्ध मंजूर केलेले सर्व जुने प्रस्ताव रद्द केले जातील.

७. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) नियामक मंडळाने इराणविरुद्ध दिलेले सर्व आदेश मागे घेतले जातील.

८.  युद्धाच्या तणावामुळे आणि निर्बंधांमुळे इराणचे जे आर्थिक नुकसान झाले, त्याची भरपाई दिली जाईल.

९. अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या तळांवरून सैन्य मागे घ्यावे.

१० केवळ इराणच नाही, तर हिजबुल्लाह आणि इराणशी संबंधित इतर गटांविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेने आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी थांबवावी. (US and Iran Announce Ceasefire)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर