इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी खुली; जगभरातून स्वागत

Strait of Hormuz Reopened by Iran; Welcomed Globally

नवी दिल्ली : इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये दहा दिवसाची तात्पुरती युद्धबंदी झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीस खुली केली आहे. इराणच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे. या निर्णयानंतर होमुर्झमधून बाहेर पडण्यासाठी इंधन आणि मालवाहतूक करणारी जहाजांची गर्दी झाली आहे. अमेरिकेसह जगभरातील सर्व देशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने कच्च्या तेलाच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात १३ टक्क्यांनी घट झाली आहे.

इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी सध्याच्या शस्त्रसंधी अंतर्गत आणि काही विशिष्ट जहाजांवर निर्बंधासह खुली केली आहे. लष्करी जहाजे आणि विरोधी शक्तीशी संबधित जहाजांना होर्मुझमधून जाण्यास परवानगी दिली  नसल्याचे प्रवक्ते रझा तिलाई निक यांनी म्हटले आहे. या निर्णयानंतर मरीनट्रॅफिक नकाशावरुन होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Strait of Hormuz Reopened by Iran; Welcomed Globally)

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी, इस्रायल-लेबनॉन दरम्यान सुरू असलेल्या युद्धविरामादरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी आता सर्व व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्यात आल्याच्या इराणच्या घोषणेचे स्वागत केले आहे. इराणने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या स्थितीबद्दल “खूप आनंदी” आहेत आणि ते चीनमध्ये होणाऱ्या त्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहेत. “होर्मुझची सामुद्रधुनी वेगाने खुली होत असल्याने राष्ट्राध्यक्ष शी खूप आनंदी आहेत,” असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर सांगितले. (Strait of Hormuz Reopened by Iran; Welcomed Globally)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू झाल्याचे स्वागत केले आहे. त्यांनी या महत्त्वाच्या सागरी मार्गावर स्थिरतेची गरज असल्याचे अधोरेखित केले आणि सततच्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था व ऊर्जा बाजारांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला. (Strait of Hormuz Reopened by Iran; Welcomed Globally)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर