पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका

Petrol and Diesel Price Hike Erupts

मुंबई : प्रतिनिधी : देशभर उन्हाचा तडाखा वाढला असताना आता भारतात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. केंद्रातील भाजप मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात तब्बल ३ रुपये १४ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत ३ रुपये ११ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशात महागाई वाढणार आहे. (Petrol and Diesel Price Hike Erupts)

संपूर्ण जगभर इंधनाचे दर वाढले असताना पाच राज्यांच्या पोट निवडणूकीमुळे केंद्र सरकारने इंधन दरात वाढ केली नव्हती. निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात नऊशे रुपयांच्या पुढे वाढ करुन सर्वसामान्यांना महागाईचा पहिला झटका दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी तेलगंणा येथील कार्यक्रमात मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीमुळे जगभरात इंधनाचा प्रश्न गंभीर झाला असून पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याच सल्ला जनतेला दिला होता. तसेच सार्वजनिक वाहतुकीचाही सल्ला दिला होता. त्यांच्या आवाहनानंतर पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे संकेत मिळाले होते. (Petrol and Diesel Price Hike Erupts)

आज मे महिन्याच्या मध्यावर भाजप मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ७० डॉलवरुन १०० डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि इंधन दरवाढ अटळ ठरली. ज्यावेळी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर्सच्या खाली होते तेव्हा भारत सरकारने पेट्रोल मिळवलेल्या उत्पन्नाचे काय केले असा सवालही विरोधकांकडून विचारला जात आहे. (Petrol and Diesel Price Hike Erupts)

मुंबईत आता पेट्रोलचा दर १०६ रुपय ६८ पैसे तर डिझेलचा दर ९३ रुपये १४ पैसे राहणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. त्यांचा फटका गोर-गरीब, मध्यमवर्गीयांच्या खिशावर पडला आहे.

Related posts

नीट ची पुनर्परिक्षा २१ जूनला

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा