Truck accident : चहा पिण्यासाठी थांबल्याने तेजस्वी बचावले

Truck accident

पाटणा :  राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे अपघातात थोडक्यात बचावले. ते चहा पिण्यासाठी थांबलेले असताना त्याच्या ताफ्यातील दोन वाहनांना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. शनिवारी पहाटे वैशाली जिल्ह्यात हा अपघात घडला. (Truck accident)

मधेपुरा येथील एका राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊन तेजस्वी यादव परतत होते. त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांचा ताफा पाटणा मुझफ्फरनगर राष्ट्रीय महामार्गावर गोरौलजवळ चहापानासाठी थांबला होता. त्यावेळी एका ट्रकने थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. वाहनामध्ये तीन सुरक्षा रक्षक जखमी झाले. अपघाताने परिसरात घबराट उडाली. पण तेजस्वी चहाच्या ठेल्यावर असल्याने अपघातातून थोडक्यात बचावले. (Truck accident)

राजदचे प्रवक्ते चित्रंजन गगन यांनी सांगितले की अपघातापासून काही मीटर अंतरावर चहा घेत असताना राजद नेते सुखरुप बचावले. दरम्यान गोरौलचे पोलिस निरीक्षक रोशन कुमार यांनी माहिती दिली. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे आणि ट्रक जप्त केला आहे. या अपघातात ट्रकची तेजस्वी यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिलेली नाही. आम्ही चालकाची चौकशी करत आहोत. (Truck accident)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर