Bakari Eid : बकरी ईद उत्साहात साजरी

Bakari Eid

कोल्हापूर : प्रतिनिधी : देशभर बकरी ईद उत्साहात साजरी झाली. मुस्लीम बांधवानी सामुहिक नमाजपठण करत गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम धर्मियांच्या घरी ईदनिमित्त शीर खुरमा आणि बिर्याणी च्या जंगी मेजवाणीचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही बकरी ईद साजरी झाली. देशाची एकात्मता आणि कोल्हापुरची सुखशांती अबाधित रहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. (Bakari Eid)

कोल्हापूर शहरात मुस्लीम बोर्डिंग, मशिदी, ईदगाह आणि सार्वजनिक मैदानावर नमाज पठण झाले. मुस्लीम बोर्डिंग येथे सामुहिक नमाज पठण झाले. इरशाद कन्नुरे, जुबेर मलबारी, राहमतुल्ला कोकणे यांनी उपस्थितांना मार्गदशन केले. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, पोलिस अधीक्षक अजित टिके, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर, माजी नगरसेवक अनिल कदम, रमेश पोवार, बापूसो मुल्ला, नासिर धारवाडकर, जमीर काझी, समीर काझी, ताज मुल्लानी, आशपाक आजरेकर, आशपाक आजरेकर उपस्थित होते. (Bakari Eid)

मुस्लीम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष अदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, जहाँगिर अत्तार, रफीक शेख, रफिक मुल्ला, फारुख पटवेगार, अल्ताप झांजी, मलिक बागवान यांच्या उपस्थितीत शिरखुरम्याचे वाटप करण्यात आले.  (Bakari Eid)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक