नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा पुनरूच्चार करत आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंग होईल, असा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक हेराफेरी करुन कशी जिंकायची हे २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दिसून आले आहे. महाष्ट्र विधानसभा निवडणूकीत लोकशाहीत हेराफेरी करण्याचा एक ब्लूप्रिंट होती असे सांगून त्यांनी क्रम सांगितला. (Match fixing in election)
पहिल्या टप्प्यात निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलची स्थापना करा. दुसऱ्या टप्प्यात बनावट मतदारांची यादीत भर घाला. तिसऱ्या टप्प्यात मतदारांची संख्या वाढवा. चौथ्या टप्प्यात भाजपला जिंकण्यासाठी जिथे आवश्यक आहे तिथे बोगस मतदानाला लक्ष्य करा. पाचवा टप्पा, पुरावे लपवा, असे पाच टप्पे राहुल गांधी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होते हे समजणे कठीण आहे. पण हेराफेरी ही मॅच फिक्सिंग करुन पक्ष खेळ जिंकू शकतो. पण त्यावेळी संस्थांना नुकसात पोहोचतो. आणि निकालावर जनतेचा विश्वास नष्ट होऊ शकतो. निवडणूकीतील हेराफेरीचे पुरावे पाहिजे पाहिजेत. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये मॅच् फिक्सिंग होईल आणि जिथे भाजप हरण्याची शक्यता आहे तिथेही असाच प्रकार होईल, मॅच फिक्स निवडणूका लोकशाहीसाठी विष आहे, असेही गांधी म्हणाले. (Match fixing in election)
राहुल गांधींनी केलेल्या टीकेला महाराष्ट्रातील भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दले आहे. राहुल गांधी यांचे विधान हे एका शाळकरी मुलाप्रमाणे आहे. जो मुलगा नापास झाल्यावर घरी येऊन म्हणतो की परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारले होते. जेव्हा ते निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोग ठीक असतात. जेव्हा ते लोकसभा निवडणूक जिंकतात तेव्हा ते काहीही बोलत नाहीत. पण जेव्हा विधानसभा निवडणुकीत ते हरतात तेव्हा आक्षेप घेतला जातो, असे कदम म्हणाले. (Match fixing in election)
दरम्यान निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा आरोप यापूर्वीच फेटाळून लावला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की “महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर सहा कोटी ४० लाख ८७ हजार ५८८ मतदारांनी मतदान केले. दर तासाला ५८ लाख मते पडली. या सरासरी ट्रेंडनुसार शेवटच्या दोन तासात ११६ लाख मतदारांनी मतदान केले असते. त्यामुळे दोन तासांत ६५ लाख मते टाकणे हे सरासरी तासिक मतदानाच्या ट्रेंडपेक्षा खूपच कमी आहे. (Match fixing in election)